नंदुरबारमध्ये घोटाळा; चौकशीचे आदेश

By admin | Published: July 22, 2016 04:17 AM2016-07-22T04:17:35+5:302016-07-22T04:17:35+5:30

स्वाभिमान सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांच्या निधीतल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले.

Scam in Nandurbar; Inquiry order | नंदुरबारमध्ये घोटाळा; चौकशीचे आदेश

नंदुरबारमध्ये घोटाळा; चौकशीचे आदेश

Next


मुंबई: नंदूरबार जिल्ह्यात स्वाभिमान सबलीकरण योजनेतील लाभार्र्थींच्या निधीमध्ये झालेला गैरव्यवहाराबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज विधानसभेत सांगितले.
डॉ.जयप्रकाश मुंदडा, प्रशांत बंब, यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावर सवरा म्हणाले की, नंदूरबार जिल्ह्यात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत राबविलेल्या स्वाभिमान सबलीकरण योजनेत लाभार्थ्यांसाठी विहिरी न खोदताच परस्पर निधी देण्यात आल्याची बाब गेल्या जूनमध्ये निदर्शनास आली आहे. एक कोटी ९० लाख रुपयांचा हा निधी होता. कृषी विभागाने आॅगस्ट २०१५ मध्ये कामे पूर्ण झाल्याचा बनावट अहवाल दिला होता. हे लक्षात आल्यावर कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
तर आगामी काळात जिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करताना जिल्हा रुग्णालयांची क्षमता दोन टप्प्यात वाढविली जाईल,
असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

Web Title: Scam in Nandurbar; Inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.