एडस्ग्रस्तांच्या औषधांचा तुटवडा

By admin | Published: May 4, 2016 03:00 AM2016-05-04T03:00:03+5:302016-05-04T03:00:03+5:30

अवास्तव औषध खरेदीचा घोटाळा अजून चर्चेत असतानाच एड्सग्रस्तांसाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांपैकी ‘झेडएल’ या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे

Scarcity of anti-depressants | एडस्ग्रस्तांच्या औषधांचा तुटवडा

एडस्ग्रस्तांच्या औषधांचा तुटवडा

Next

- विजय मोरे,  नाशिक
अवास्तव औषध खरेदीचा घोटाळा अजून चर्चेत असतानाच एड्सग्रस्तांसाठी संजीवनी ठरणाऱ्या औषधांपैकी ‘झेडएल’ या औषधांचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे़ त्यामुळे एड्सग्रस्तांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. १५ दिवसांत औषधे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
उपरोक्त औषधे त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी नेटवर्क आॅफ नाशिक बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़ नाशिक जिल्ह्यात ५,१४७ स्त्री-पुरुष व ३४७ लहान मुलांना एड्सचा संसर्ग झालेला आहे़ त्यांच्यासाठी ए़आऱटी. औषधे संजीवनी ठरली आहेत़ मात्र या औषधांपैकी ‘झेडएल’ या गोळ््यांचा १५ दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला आहे़ ए़आऱटी. औषधे वेळेवर घ्यावी लागतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांकडे सीडी-तपासणी व एआरटी औषधे घेण्यासाठीसुद्धा पैसे नसतात़ त्यातच काहींना दोन महिन्यांपासून संजय गांधी योजनेचे अनुदानही मिळालेले नाही़ औषधांचा साठा त्वरित उपलब्ध करून न दिल्यास उपोषणाचा इशारा संघटनेचे महेंद्र मुळे यांनी दिला आहे़

दररोज ईमेल व पत्रव्यवहार करतो
नाशिक जिल्ह्यातील एड्सग्रस्तांना आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा ए़आऱटी. सेंटरमधून केला जातो़ मात्र १५ दिवसांपासून ‘झेडएल’ औषधांचा तुटवडा आहे़ संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती असून मुंबई येथील महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीला दररोज ई-मेल व पत्रव्यवहार करीत आहोत़
- डॉ़ सुनील ठाकूर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, नाशिक

Web Title: Scarcity of anti-depressants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.