पेट्रोल डीलर्सच्या दक्षतेने टळला तुटवडा
By admin | Published: October 4, 2014 11:55 PM2014-10-04T23:55:51+5:302014-10-04T23:55:51+5:30
बँकांना सलग सुट्टय़ा आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता. या वेळी मात्र पेट्रोल डीलर्सनी आधीच दक्षता घेतल्याने शहरात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार नाही.
Next
>पुणो : बँकांना सलग सुट्टय़ा आल्यामुळे ऑगस्ट महिन्यात पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता. या वेळी मात्र पेट्रोल डीलर्सनी आधीच दक्षता घेतल्याने शहरात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार नाही. शनिवार वगळता सलग 8 दिवस बँका बंद असूनही रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)ची प्रक्रिया आधीच केल्याने डेपोतून पेट्रोल खरेदी करणो शक्य झाले आहे.
पेट्रोल डीलर्सना लोणी येथील डेपोतून पेट्रोल खरेदी करण्यासाठी आधी ‘आरटीजीएस’चा फॉर्म भरावा लागतो. त्याची माहिती डेपोत दिल्यानंतरच पेट्रोल दिले जाते. ऑगस्ट महिन्यात दि. 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान सुट्टय़ांमुळे बँका बंद होत्या. या वेळी आरटीजीएस न घेतल्याने डेपोतून डीलर्सना पेट्रोल घेता आले नाही. परिणामी शहरात दोन दिवस पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला होता. शहरातील सुमारे 35क् पंप बंद पडले होते. त्यामुळे वाहनचालकांचे मोठे हाल झाले होते. त्या वेळी पेट्रोलचे दरही वाढल्याने पेट्रोल डीलर्सनी पेट्रोल खरेदी करण्याचे टाळले, अशीही चर्चा होती. मात्र, शहरातील पेट्रोलची गंभीर स्थिती पाहता पुणो पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मध्यस्थी करत कंपनीला डीलर्सना हमीवर पेट्रोल देण्याची विनंती केली होती. त्यानंतर हा तिढा सुटला होता.
दि. 29 व 3क् सप्टेंबर या दोन दिवशी बँकांचे व्यवहार बंद होते. तसेच दि. 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान बँकांना सुट्टय़ा होत्या. शनिवारी अर्धा दिवस बँका सुरू राहतील. पुन्हा रविवार व सोमवारी बँका बंद आहेत. त्यामुळे बँकांमध्ये पैसे भरून आरटीजीएस भरणो डीलर्सना शक्य नव्हते. याचा विचार करून बहुतेक सर्व डीलर्सनी आधीच दक्षता घेतल्याचे दिसते. सुट्टीतील उर्वरित दिवसही पेट्रोलचा पुरवठा सुरळीत राहणार आहे. (प्रतिनिधी)
मागील वेळी झालेली परिस्थिती लक्षात घेऊन या वेळी शहरातील बहुतेक सर्व डीलर्सनी दक्षता घेतली आहे. बँकांना सुट्टय़ा लागण्याआधीच आरटीजीएस काढण्यात आले आहेत. तसेच डेपोही सुरू आहेत. त्यामुळे पेट्रोल मिळण्यात कसलीही अडचण आली नाही.
- अली दारूवाला,
प्रवक्ता, पेट्रोल डीलर्स असोसिएशन