देखाव्यातून ‘द्रुतगती’वर प्रकाशझोत

By admin | Published: September 11, 2016 01:05 AM2016-09-11T01:05:29+5:302016-09-11T01:05:29+5:30

गणेशोत्सवात अनेक मंडळांकडून समाजप्रबोधनपर देखावे सादर केले जातात. मात्र, सोमाटणे येथील विजय पिंजण यांनी घरघुती गणपतीच्या सजावटीतून मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर

From the scene, 'Lightning' lights up | देखाव्यातून ‘द्रुतगती’वर प्रकाशझोत

देखाव्यातून ‘द्रुतगती’वर प्रकाशझोत

Next

उर्से : गणेशोत्सवात अनेक मंडळांकडून समाजप्रबोधनपर देखावे सादर केले जातात. मात्र, सोमाटणे येथील विजय पिंजण यांनी घरघुती गणपतीच्या सजावटीतून मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर होणाऱ्या अपघाताचा देखावा तयार करून जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
पिंजण यांनी द्रुतगती महामार्गावरील अपघातांचा देखावा व चित्र हुबेहूब सादर केली आहेत. पिंजण यांनी यापूर्वीही सामाजिक भान ठेवत गौरी-गणपती सजावटीमध्ये देखावे सादर केले आहेत. द्रुतगती महामार्गावरती होणारे अपघात आणि महामार्ग प्रमाणात मृत्यूचा सापळा बनत चाललाय, याकडे लक्ष वेधले आहे. अपघात, वाहतूककोंडी, दरड कोसळणे, वाहनचालकांकडून होणारे नियमभंग, अनियंत्रित वेग, चालकांकडून मद्यपान, महामार्गावरील जनावरे, दुचाकी यांचा मुक्त संचार कारणे देखाव्यातून मांडली आहेत.
देखाव्यात द्रुतगती महामार्गावर १४ वर्षांत १४ हजार ५०० अपघात व १४०० जणांना आपला प्राण गमवावे लागले असल्याची माहिती. या अपघातात सिनेकलाकारांनाही आपले जीव गमवावे लागले. त्यांचे फोटो लावून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. जोरदार पावसामुळे वाहून गेलेल्या पुलाचीही माहिती दर्शवण्यात आली. द्रुतगती महामार्गालगतच राहणारे पिंजण यांनी येथील रस्त्यांची स्थिती दर्शविली आहे. यासाठी शिवाजी तुपे , विशाल पिंजण यांचीही मदत महत्त्वाची ठरली आहे. द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सुरक्षिततेसाठी माहिती या देखाव्यातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. (वार्ताहर)

Web Title: From the scene, 'Lightning' lights up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.