चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 02:08 AM2018-11-21T02:08:55+5:302018-11-21T02:09:40+5:30

मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.

 The scepter took four times, the tremendous thrashing in the Legislative Assembly | चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

Next

मुंबई : मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.
आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ, घोषणाबाजी सुरू असताना अस्लम खान यांनी अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलला आणि नंतर त्यांच्यासह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, काँग्रेसचे आसीफ शेख, अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील हे राजदंड उंचावून बराच वेळ सभागृहाला दाखवत होते.
अस्लम शेख तेवढ्यावरच थांबले नाहीत ते सदस्यांच्या आसनाजवळ राजदंड घेऊन गेले आणि तो उलटा करून त्यांनी तो काठीसारखा हातात घेतला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना राजदंड परत देण्याची विनंती केली पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गदारोळात कामकाज तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले तेव्हादेखील अस्लम शेख यांनी आणि तिसºया वेळी वारीस पठाण यांनी राजदंड
उचलला.
तिन्हीवेळा अध्यक्षांच्या खुर्चीत तालिका अध्यक्ष सुभाष साबणे होते. त्यांनी राजदंड उचलणाºया सदस्यांना आधी दोन वेळा कुठलीही समज दिली नाही. तिसºयांदा त्यांनी समज दिली.
राजदंड मतदारसंघात
नेऊ द्या - आव्हाड
सभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. प्रथा परंपरा तोडून मोडून टाकल्या जात असतील आणि राजदंड ही शोभेची वस्तू होत असेल तर मग मला तो मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी
केली.
विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचे हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजे
मुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावर
विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला, असेही आव्हाड म्हणाले.

विधान परिषदेतही गोंधळ
मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत कामकाज रोखून धरले. सुरुवातीला दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडण्यास सुरुवात केली. आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांचा प्रश्न
शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या विधवांचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी दुष्काळाकडे स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यावर निवेदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी शाळांच्या अनुदानाचा विषय उपस्थित केला. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वीच कोणत्या शाळा पूर्ण अनुदानासाठी योग्य आहेत, हे जाहीर केले जाईल, असे तावडे म्हणाले. तावडेंच्या निवेदनानंतर तालिका सभापती जगन्नाथ शिंदे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

Web Title:  The scepter took four times, the tremendous thrashing in the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.