राज्यातील एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 07:29 PM2019-09-03T19:29:59+5:302019-09-03T19:35:45+5:30

सुमारे महिनाभरानंतर एमबीए प्रवेशाबाबत न्यायालयाने निर्णय दिला.

Schedule of MBA admission process announced in the state | राज्यातील एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणारप्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ४ व ५ सप्टेबर रोजी ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरला भेट देणे बंधनकारक

पुणे: राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी-सेल)मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द केले आहे.विद्यार्थ्यांना ३ स्पटेबर ते 18 सप्टेबर या कालावधीत तीन प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून प्रवेश दिले जाणार आहेत.
सुमारे महिनाभरानंतर एमबीए प्रवेशाबाबत न्यायालयाने निर्णय दिला.त्यामुळे उशिरा का होईना अखेर एमबीए अभ्यासक्रमाचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.सीईटी-सेलने पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश यादी मंगळवारी (दि.३)प्रसिध्द केली आहे.पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ४ व ५ सप्टेबर  रोजी ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटरला (एआरसी)भेट देणे बंधनकारक आहे. मात्र,१८ ते २१ जुलै या कालावधीत एआरसी सेंटरला भेट देवून प्रवेशाबाबतचे शुल्क जमा केले आहे,अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एआरसी सेंटरला भेट देण्याची आवश्यकता नाही. पहिल्या फेरीतून प्रवेश मिळाल्या विद्यार्थ्यांनी ४ ते ६ सप्टेबर या कालावधीत संबंधित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट  मध्ये जावून प्रवेश घेणे आवश्यक आहे.परंतु,ज्या विद्यार्थ्यांनी १९ ते २२ जुलै या कालावधीत यापूर्वीच प्रवेश घेतला आहे.तसेच त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी प्रवेश मिळाला आहे.त्यांनी पुन्हा प्रवेशासाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याची गरज नाही.
प्रवेशाची दुसरी फेरी येत्या ७ सप्टेबर रोजी सुरू होणार असून या दिवशी रिक्त जागांची माहिती प्रसिध्द केली जाईल.विद्यार्थ्यांना येत्या ७ व ८ सप्टेबर या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून सबमिशन,कन्फर्मेशन आणि पसंतीक्रम भरता येतील. दुस-या फेरीची प्राथमिक गुणवत्ता यादी ९ सप्टेबर रोजी प्रसिध्द केली जाईल.पात्र,विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत एआरसी सेंटरला भेट द्यावी लागेल. मात्र,एआरसीमध्ये १८ ते २१ जुलै या कालावधीत जावून शुल्क भरले आहे,अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा एआरसीत जाण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेबर या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे.
तिसरी प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १२ सप्टेबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.विद्यार्थ्यांना तिस-या फेरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.या फेरीची प्राथमिक गुणवत्ता यादी १५ सप्टेंबरला प्रसिध्द होईल. विद्यार्थ्यांना १६ ते १७ या कालावधीत एआरसीला भेट द्यावी लागेल.त्यानंतर प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना १६ ते १८ सप्टेबर या कालावधीत संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा लागेल.

Web Title: Schedule of MBA admission process announced in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.