विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बँक खात्यामार्फत देणार

By admin | Published: December 12, 2014 02:05 AM2014-12-12T02:05:34+5:302014-12-12T02:05:34+5:30

राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

The scholarship of the students will be given by the bank account | विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बँक खात्यामार्फत देणार

विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बँक खात्यामार्फत देणार

Next
नागपूर : राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबत निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. यावर उत्तर देताना सावरा यांनी ही माहिती दिली.
राज्यात इयत्ता पहिली ते दहावीर्पयत शिक्षण घेणा:या अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्याथ्र्याना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जर कोणी अधिकारी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणाला पाठीशी घालण्यात येणार नाही असे सावरा यांनी आश्वासन दिले.
विदर्भात अवैध सावकारीच्या 25क् तक्रारी
राज्यातील शेतकरी व गोरगरिबांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणा:या सावकारी पाशाला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत अवैध सावकारीबाबत विदर्भात 25क् तर मराठवाडय़ात 2क्1 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 18 नुसार प्राप्त तक्रारींच्या आधारे शेती खरेदी विक्री व्यवहार तपासण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत सुरू आहे. अवैध सावकारीतून उद्भवलेला मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार सुनावणीनंतर रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाचे अधिकारी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले असून त्यावर पक्षकार विभागीय सहनिबंधकाकडे अपिल दाखल करु शकतात असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 2क्16 र्पयत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2क्16 र्पयत पूर्ण होणो अपेक्षित असल्याचे उत्तर शासनातर्फे देण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला उशीर झाल्यामुळे महामार्गाची स्थिती धोकादायक झाल्याबाबत राहुल नाव्रेकर, जयंत पाटील, विजय सावंत यांनी प्रश्न विचारला होता. यावर लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2क्11 साली सुरू झाले. हे बांधकाम जून 2क्14 मध्येच पूर्ण व्हायला हवे होते. परंतु येथील अतिक्रमण काढणो, उद्योजकामार्फत काम करण्याची संथगती यामुळे या कामास विलंब होत आहे अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)

 

Web Title: The scholarship of the students will be given by the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.