अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम अडकली

By admin | Published: July 7, 2016 05:42 PM2016-07-07T17:42:48+5:302016-07-07T17:42:48+5:30

अचूक बँक खाते क्रमांक अप्राप्त असल्याने वाशिम जिल्ह्यातील जवळपास ४५५४ विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले व अस्वच्छ व्यवसाय या दोन्ही योजनेंतर्गतची शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित बँकेत पडून आहे

Scholarships are stuck due to the exact bank account | अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम अडकली

अचूक बँक खात्याअभावी शिष्यवृत्तीची रक्कम अडकली

Next

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ७ : अचूक बँक खाते क्रमांक अप्राप्त असल्याने वाशिम जिल्ह्यातील जवळपास ४५५४ विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले व अस्वच्छ व्यवसाय या दोन्ही योजनेंतर्गतची शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित बँकेत पडून आहे.
विद्यार्थिनी व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती दिली जाते. सन २०१५-१६ या वर्षात वाशिम जिल्ह्यात सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेंतर्गत १३ हजार २९९ तर अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २९५५ प्रस्ताव प्राप्त झाले होते. शिष्यवृत्तीची सदर रक्कम संबंधित विद्यार्थ्यांचा बँक खात्यात जमा केली जाते. सुरूवातीला शासनाकडून निधी आला नाही आणि निधी आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक संबंधित बँकेकडे सादर करण्यात आले नाही. त्यामुळे अद्यापही जवळपास ४५५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.
 जून २०१६ अखेरीस सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे १३ हजार २९९ पैकी नऊ हजार विद्यार्थिनींचे अचूक बँक खाते प्राप्त झाल्याने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. अद्याप ४२९९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तींतर्गत २९५५ पैकी २७०० विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते प्राप्त झाल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली. अद्याप २५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Scholarships are stuck due to the exact bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.