शिक्षकांच्या भांडणामुळे विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 09:30 PM2017-07-24T21:30:36+5:302017-07-24T21:30:36+5:30
पिंप्री खंदारे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक, त्यांची दोन मुले व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर हाणामारीची घटना २२ जुलै रोजी घडली
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बिबी, दि. 24 - पिंप्री खंदारे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक, त्यांची दोन मुले व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोर हाणामारीची घटना २२ जुलै रोजी घडली. या भांडणामुळे विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकत सोमवारी एकही विद्यार्थी शाळेत आला नाही.
मुख्याध्यापक जयराम जाधव व त्यांची दोन्ही मुले श्रावण, पवन यांनी शिक्षक प्रकाश तागवालेयांना वर्गात जावून मारहाण केली. परस्परांच्या तक्रारीवरुन ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल झाले. सोमवारी २४ जुलैला शाळेत एकही विद्यार्थी आला नव्हता. दोषींवर कार्यवाही करण्याची सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, शालेय शिक्षण समिती व पालकांनी केली आहे. घटनेच्या दिवशी लोणार पं.स.चे कक्ष अधिकारी गजानन पाटोळे यांनी येऊन दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते.
परंतु ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. २४जुलै रोजी पं.स. गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, पोषण आहार अधिक्षक अे.आर. विखे, केंद्रप्रमुख वि.ल.राजगुरु यांनी शाळेला भेट देऊन घटनास्थळ अहवाल सादर केला. भांडणामध्ये शाळेच्या संगणकाची नासधूस, खुर्च्या तुटलेल्या अवस्थेत, पोषण आहाराची विखुरलेली अवस्था, कपाट उघड्या अवस्थेत, स्टॉक रजिस्टर आढळून आले नाही. शाळेच्या आवारात घाण पसरली आहे.
यावेळी सरपंच, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्गाच्या तक्रारीवरुन दोषी मुख्याध्यापक जयराम जाधव यांना निलंबीत करावे, त्याचप्रमाणे शिक्षक अशोक किसन बावरे यांच्या वर्तणुकीमध्ये व शैक्षणिक कार्याबाबत ग्रामस्थांची, पालकांची, शाळा समितीची असलेली तीव्र नाराजी तसेच पालकांची लेखी तक्रार यावरुन त्यांची बदली करावी, अशी मागणी केली.