भाड्याच्या जागेत शाळांची किलबिल

By admin | Published: September 23, 2014 04:40 AM2014-09-23T04:40:15+5:302014-09-23T04:40:15+5:30

स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत़

School chatter in the rental space | भाड्याच्या जागेत शाळांची किलबिल

भाड्याच्या जागेत शाळांची किलबिल

Next

रहिम दलाल, रत्नागिरी
स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळा भाड्याच्या इमारतींमध्ये भरविण्यात येत आहेत़ या शाळांच्या स्वत:च्या मालकीच्या इमारती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने वाड्या, वस्त्यांवर शाळा सुरु करुन शिक्षणाचा पाया खोलवर रुजविण्याचा प्रयत्न केला आहे़ मात्र, त्यासाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक होते़ मात्र, इमारतींचा विचार करीत असते तर आज अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये शिक्षणाचा पाया रुजू शकला नसता़ त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळा सुरु करतानाच इमारती भाड्याने घेतल्या़
जिल्हा परिषदेच्या २७४७ प्राथमिक शाळा आहेत़ या बहुतांश शाळांच्या इमारती जुन्या असल्याने अनेक शाळांच्या वर्गखोल्या सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधी ्नरुपयांचा खर्च आल्या बांधण्यात आल्या आहेत़
तरीही आज जिल्हा परिषदेच्या १४६ प्राथमिक शाळांच्या इमारती भाड्याच्या आहेत़ शिक्षणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च शिक्षणावर करण्यात येत असताना गेल्या अनेक वर्षांपासून या शाळांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. या शाळांच्या इमारतीचे भाडे किरकोळ प्रमाणात असले तरी ते इमारतीच्या मालकांना वेळेवर मिळत नसल्याने ओरड सुरु आहे़ लाखो रुपयांचे भाडे अजूनही जिल्हा परिषदेकडून थकीत आहे.

Web Title: School chatter in the rental space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.