वाहतूक काेंडीत नाहकच अडकणार चिमुकले जीव; प्रदूषणाचाही सामना करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:47 AM2024-02-28T06:47:55+5:302024-02-28T06:48:07+5:30
राज्यातील माेठ्या शहरांना वाहतूक काेंडी समस्येने ग्रासले आहे. सकाळी ८ वाजेनंतर वाहनांच्या संख्येत माेठी वाढ हाेते.
- प्रशांत बिडवे
लाेकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वप्राथमिक ते इयत्ता चाैथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरविण्यात येणार आहेत. शाळेची वेळ बदलल्याने स्कूल बस, व्हॅनचालकांचे विद्यार्थी विभागले जातील, तसेच फेऱ्यांतही वाढ करावी लागेल. त्यामुळे मासिक भाड्यातही तब्बल २५ ते ३० टक्के दरवाढ करावी लागणार आहे, असे स्कूल बस संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकीकडे पालकांच्या खिशाला झळ बसण्यासह दुसरीकडे चिमुकल्यांची वाहतूक काेंडीसह प्रदूषणाचा सामना करीत शाळेमध्ये वेळेत पाेहोचण्याची कसरत हाेईल.
राज्यातील माेठ्या शहरांना वाहतूक काेंडी समस्येने ग्रासले आहे. सकाळी ८ वाजेनंतर वाहनांच्या संख्येत माेठी वाढ हाेते. याच वेळेत नर्सरी ते प्राथमिक शाळांत जाणाऱ्या स्कूल बस, व्हॅन, रिक्षा, दुचाकी वाहनांची भर पडल्यास वाहतूक काेंडीचा प्रश्न आणखी गंभीर हाेऊ शकताे, तसेच मुलांना शाळेमध्ये वेळेत पाेहोचविण्याचे आव्हानही चालकांसमाेर उभे ठाकणार आहे. नाेकरी करणाऱ्या पालकांसाठी हीच वेळ गडबडीची असल्याने त्यांचीही त्रेधातिरपीट उडणार आहे.
का हाेणार स्कूल बसची भाडेवाढ?
nशाळेत ने- आण करण्याच्या फेऱ्या वाढतील.
nवाहतूक काेंडीमुळे डिझेलवरील खर्चही वाढणार.
nबस चालक,
मावशींना ओव्हरटाइम पगार द्यावा लागेल.
‘सध्याची वेळ सर्वाेत्तम’
शहरातील शाळांची सध्याची वेळ सर्वाेत्तम आहे. सकाळी ७ ते ८ या कालावधीत नर्सरी ते दहावीपर्यंतची मुले शाळेत पाेहोचतात.
हे विद्यार्थी दुपारी १२ ते ५ या कालावधीत घरी परततात. या वेळेत वाहतूक काेंडीचा त्रास कमी हाेताे. माध्यमिक शाळेची वेळ वाढल्यास त्या विद्यार्थ्यांनाही वाहतूक काेंडीचा त्रास हाेईल, असे बसचालकांचे म्हणणे आहे.
प्राथमिक शाळेची वेळ सकाळी ९ वाजता निश्चित केली, तर विद्यार्थी कमी मिळतील. फेऱ्या वाढल्याने भाड्यातही वाढ करावी लागेल, तसेच शहरांमध्ये या वेळेत विद्यार्थ्यांना वाहतूक काेंडीचा सामनाही करावा लागेल.
- संपत पाचर्णे, कार्याध्यक्ष, अखिल
महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक महासंघ