लोकसहभागातून शालेय पोषण आहार

By admin | Published: February 13, 2017 04:01 AM2017-02-13T04:01:13+5:302017-02-13T04:01:13+5:30

करवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका

School nutrition diet from people's participation | लोकसहभागातून शालेय पोषण आहार

लोकसहभागातून शालेय पोषण आहार

Next

वीरकुमार पाटील / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील सर्व २७0 शाळांंमधील पोषण आहार गॅसवर शिजविला जाणार आहे. लोकसहभागातून असा उपक्रम राबविणारा हा राज्यातील पहिलाच तालुका बनणार असून, याचा लाभ ४३ हजार ५६0 विद्यार्थ्यांना होईल.
येत्या मंगळवार (दि. १४) पासून कुडित्रे (ता. करवीर, जि. कोल्हापूर) केंद्र शाळा येथे या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळेकडे मुलांचा ओढा वाढावा, यासाठी शासनाने १९९५ साली शालेय पोषण आहाराची योजना सुरूकेली. त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला तीन किलो तांदूळ देण्यात येत होता. २00९ला यामध्ये बदल करून बचत गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला भात, आमटी, भाजी द्यायला सुरुवात झाली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बचत गटांना तांदूळ, डाळींचा पुरवठा करण्यात येतो. भाजी व इंधनासाठी पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे १.५१ पैसे, तर सहावी ते आठवीपर्यंत २.१७ पैसे देण्यात येतात. हा पोषण आहार बचत गट चुलीवर शिजवून देतो. राज्यात त्यासाठी दरवर्षी
हजारो टन लाकूड जाळले जाते.
त्यातून पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच प्रदूषणही होेते. त्यामुळे शासनाने हा आहार गॅसवर शिजवावा, त्यासाठी लोकसहभागाचा आधार घ्यावा, असा आदेश आॅक्टोबर २0१५ मध्ये दिला. त्यानुसार, करवीर तालुक्यातील प्रशासनाने कंबर कसली आहे.
बचत गटाकडे रिफिलिंग
जेथे पटसंख्या अधिक तेथे दोन, तर कमी असेल तेथे एक टाकीचे गॅस कनेक्शन संबंधित शाळेच्या नावावर राहणार आहे. त्याचे रिफिलिंग बचत गटाने करावयाचे आहे. त्यांना ६00 विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक सिलिंडर मिळणार असून, त्यासाठी पंचायत समिती त्यांना विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात पूर्वीइतकेच इंधन अनुदान दिले जाणार आहे.

Web Title: School nutrition diet from people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.