‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

By प्रविण मरगळे | Published: December 19, 2020 02:43 PM2020-12-19T14:43:20+5:302020-12-19T14:51:13+5:30

गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६  टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते.

The school reopening from January 4 in 'Nashik' district Says Chhagan Bhujbal | ‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

‘या’ जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार; ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू होणार

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्ययेत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेतआरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म नियोजन करण्यात यावे.

नाशिक - जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीने जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य या प्रशासकीय यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच कोविड लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्व तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा लसीकरणासाठी सज्ज आहेत अशी माहिती पालकमंत्री छागन भुजबळ यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात ४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका, नगरपरिषदा तसेच आरोग्य यंत्रणेने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कोविड चाचण्या करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जेणेकरून शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत सर्व संबंधित शिक्षक व शाळेतील कर्मचारी वर्ग यांचा कोविड तपासणीचा रिपोर्ट वेळेत प्राप्त होवून शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना अडचण निर्माण होणार नाही. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसात सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाला मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व नियमित सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य राहिल, असंही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. तसेच राज्याच्या २.६  टक्के मृत्यूदराच्या तुलनेत जिल्ह्याच्या मृत्यूदर १.६ टक्के इतकाच असल्याने जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी वाटते. येत्या काही महिन्यात उपलब्ध होणाऱ्या कोविड लसीबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या लसींची निर्मीती करण्यात येत असून या लसी देण्याचे प्रमाण व पद्धती देखील भिन्न आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एकाच प्रकारची लस उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न व्हावेत असं जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बैठकीत सांगितले.

या लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यात ६५० लसीकरणाचे बुथ निर्माण करण्यात येणार असून एका बुथवर किमान १०० नागरिकांना एका दिवसात लसीकरण केले जाईल, या दृष्टीने प्रशासनामार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच एक लस ही काही दिवसांच्या अंतराने दोन वेळा देण्यात येणार असल्याने त्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणाकडून तयारी करण्यात येत आहे, अशी माहितीही पालकमंत्री भुजबळ यांनी दिली आहे. 

 

Web Title: The school reopening from January 4 in 'Nashik' district Says Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.