School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनला सुरू, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:20 AM2023-04-19T09:20:52+5:302023-04-19T09:21:14+5:30

School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले.

School: Schools in the state except Vidarbha will open on June 15, Education Minister Deepak Kesarkar announced | School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनला सुरू, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

School: विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जूनला सुरू, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

googlenewsNext

मुंबई :  विदर्भ वगळता राज्यातील शाळा उन्हाळी सुटीनंतर १५ जून रोजी सुरू होतील. तर विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होतील, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी जाहीर केले. त्यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.

पालकांना शाळा नक्की कधी सुरू होणार याचा अंदाज असेल तर त्यांना सुट्यांचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. याच हेतूने १५ जूनला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. विदर्भामध्ये जूनमध्ये तापमान वाढलेले असल्याने तेथील शाळा ३० जूनला सुरू होतील. 

शालेय शिक्षणमंत्री म्हणाले.. 
    विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. 
    विद्यार्थ्यांची सायकोमॅट्री चाचणी सहावीपासून घेण्यास सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ लाख विद्यार्थ्यांची चाचणी. 
    बालभारती पुस्तकाचे दर वाढले तरी सरकारी शाळांमधील ९० टक्के मुलांना विनामूल्य पुस्तके दिली जातील. 
    खासगी शाळा भरमसाट फी आकारतात. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल.
आता पुस्तकातच वही
यापूर्वी दारिद्र्य रेषेखालील तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जात होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेष दिले जातील. तसेच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकातच प्रत्येक धड्याच्या शेवटी वह्यांची पाने जोडली जातील, असेही केसरकर यांनी सांगितले.

Web Title: School: Schools in the state except Vidarbha will open on June 15, Education Minister Deepak Kesarkar announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.