स्कूल व्हॅनला अपघात

By admin | Published: June 28, 2017 03:40 AM2017-06-28T03:40:54+5:302017-06-28T03:40:54+5:30

लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या एका खासगी बसला मंगळवारी सकाळी किरकोळ अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.

School Van Accident | स्कूल व्हॅनला अपघात

स्कूल व्हॅनला अपघात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लहान मुलांना शाळेत नेणाऱ्या एका खासगी बसला मंगळवारी सकाळी किरकोळ अपघात झाला. यात कोणीही जखमी झाले नसले तरी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.
कांदिवलीच्या चिल्ड्रेन्स अ‍ॅकॅडमी या शाळेत शिकणारे सहा ते सात वयोगटातील पाच विद्यार्थी नेहमीप्रमाणे एका खासगी गाडीने शाळेला जाण्यासाठी निघाले. अचानक त्यांची गाडी कांदिवलीच्या कल्पवृक्ष टॉवरशेजारील उड्डाणपुलावर धडकली. चालकाने वेळीच प्रसंगावधान साधत ती गाडी सावरली. या अपघातामुळे गाडीत बसलेली मुले घाबरली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या मुलांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याचे कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी सांगितले. आम्ही याची वाहतूक डायरी बनवली आहे. तो अहवाल आरटीओकडे पाठवून दिल्याचेही पवार यांनी नमूद केले. मात्र या अपघाताबाबत सोशल मीडियावर मेसेज फिरल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयाजवळ गर्दी केली होती.

Web Title: School Van Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.