CoronaVirus News: राज्यातील शाळा कधी सुरू होणार?; मंत्रिमंडळ बैठकीतून मिळाले महत्त्वाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 04:50 AM2020-10-08T04:50:34+5:302020-10-08T08:06:52+5:30
केंद्राने निर्णय घेतला असला तरी राज्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही.
मुंबई : केंद्र सरकारने शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची भूमिका घेतलेली असली तरी राज्यात मात्र दिवाळीनंतर या बाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.
केंद्राने निर्णय घेतला असला तरी राज्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही. काही राज्यांनी आधी शाळा सुरू केल्या पण कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्या पुन्हा बंद केल्या. अशी धरसोड भूमिका योग्य ठरणार नाही. आपण आॅनलाइन शिक्षणाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोरोनासंदर्भातील सद्यस्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी, शाळा सुरू करण्यासंदर्भात काय अशी विचारणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्यावर, सध्या शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.