‘यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरू होणार नाहीत’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 01:08 AM2020-04-16T01:08:37+5:302020-04-16T01:08:45+5:30
या पार्श्वभूमीवर २०१९ -२० या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांच्याकडून शिक्षण आयुक्ताना देण्यात आल्या आहेत
मुंबई : दरवर्षी पहिली ते आठवीच्या इयत्तांचे निकाल ३० एप्रिलपर्यंत जाहीर केल्यानंतर मे महिन्याच्या २ ते ३ तारखेपासून शाळाना सुट्टी लागते आणि १५ जूनपासून पुन्हा शाळा सुरु केल्या जातात. मात्र सध्याची राज्यातील परिस्थितीमुळे सगळ्याच शैक्षणिक संस्था पुढील आदेशापर्यंत ३ मेपर्यंत बंदच असणार आहेत.
या पार्श्वभूमीवर २०१९ -२० या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरु करण्यात येऊ नयेत अशा सूचना शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांच्याकडून शिक्षण आयुक्ताना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीमुळे दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांपर्यंत पोहोचवणे, तपासलेल्या उत्तरपत्रिका सरपरीक्षक आणि विभागीय मंडळाकडे पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीवर लॉकडाऊन संपल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल. संचारबंदी लागू झाल्यानंतर हा नियम शिथिल करून उत्तरपत्रिका घरी नेऊन तपासण्यासाठी परवानगी दिली. मात्र, त्या शिक्षकांपर्यंत पोहचवणे अशक्य अस्लयाने मंडळाने हा निर्णय घेतला.