विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमध्ये विज्ञान लेखकांची भूमिका मोठी

By Admin | Published: February 5, 2017 12:28 AM2017-02-05T00:28:53+5:302017-02-05T00:30:11+5:30

जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात लोकमतचे

Science writers have a large role in the scientific society | विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमध्ये विज्ञान लेखकांची भूमिका मोठी

विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीमध्ये विज्ञान लेखकांची भूमिका मोठी

googlenewsNext

- जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तिसऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात लोकमतचे कार्यकारी संपादक (डिजिटल) चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित भाग.

माहितीच्या ढिगाचे रूपांतर ज्ञानात होण्याची प्रक्रि या गॅलिलिओच्या कर्तृत्वामुळे जगभरात सुरू झाली. माहितीचा व पूर्वानुभवाचा ढिगारा विज्ञानाचेच सख्खे भावंड असलेल्या गणिताच्या मुशीत घातल्यानंतर यंत्रशास्त्र विकसित झाले. ग्रहगणित सिद्ध झाले. निसर्गातील रहस्यांची उकल होऊ लागली. मॅक्सवेल आणि न्यूटन या दोन खांबांचा भक्कम आधार मिळाल्यावर आधुनिक विज्ञानाची वास्तू उभी राहिली. इंग्रजी भाषेत गेल्या शे-दोनशे वर्षांत झालेले विज्ञान लेखन हा त्याचाच परिपाक होता. इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीतील विज्ञान लेखनाची सुरुवात अंमळ उशिराने झाली. विज्ञान लेखनाच्या बाबतीत एक सनातन प्रश्न उपस्थित केला जातो - या प्रांतात मूळ विचार, सिद्धांत अथवा निष्कर्षाला जास्त महत्त्व द्यावयाचे, की भाषेची शैली आणि समृद्धीला अधिक महत्त्व द्यावयाचे? माझ्या मते भाषा समृद्ध झाल्यामुळेच अमूर्त संकल्पनांना अचूक अर्थवाही कोंदण मिळू शकले.
वैज्ञानिक वा संशोधक हे बिरूद लागू शकेल अशा मोजक्या प्रतिभासंपन्न व्यक्तींपुरते मर्यादित असलेले ज्ञान सामान्य विज्ञानाच्या रूपात जनसामान्यांपर्यंत नेण्याचे काम विज्ञान लेखकांच्या वाट्याला आले आहे. ही विज्ञानाची नव्हे, तर अज्ञानाविरुद्धची लढाई आहे. विज्ञानातील प्रयोग आणि जादूचे खेळवजा चमत्कृती यातील महद्अंतर समजण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीचा पिंड जोपासला जाणे ही पूर्वअट बनते. वैज्ञानिकांनी संशोधन करावे आणि वैज्ञानिक दृष्टीचा प्रचंड अभाव असलेल्या समाजाने आपला भावनिक-आध्यात्मिक पिंड जोपासत राहावे, अशा स्थितीतून विज्ञान आणि समाज यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्याचा वसा घेतलेले दूत म्हणजे विज्ञान लेखक. विज्ञान भावनांवर चालत नाही. श्रद्धा, सहिष्णुता, भाबडेपणा हे ज्याला वर्ज्य आहे, विज्ञान मानवी संस्कृतीला कोठवर नेणार आहे याचा भविष्यवेधी आडाखा सामान्यांच्या पुढ्यात मांडण्याचे काम विज्ञान लेखकांनी मराठीत सुरू केलेही आहे. वास्तवाचे भान ही या लेखनाची पूर्वअट ठरते. वस्तुस्थिती प्रतिभेची मागणी करते तेव्हा त्यातून विज्ञान लेखनाची कलाकृती साकारते. असिमॉव्ह, आर्थर क्लार्कयांनी हेच तर सिद्ध केले. आधी विज्ञान, मग शब्द या क्रमाला विज्ञान लेखनात महत्त्व असायला हवे. कल्पनेच्या भराऱ्या मारायच्या तर ‘अ‍ॅलिस इन वंडरलॅण्ड’सारखे लेखन विपुल करू शकणारे लेखक कमी नाहीत. अर्थात कल्पनेची अफाट भरारी घेणारे रूपक आणि बावनकशी विज्ञान यांच्यात प्रीतीसंगमातून ज्युरासिक पार्कसारखी कलाकृती जन्माला येते.

Web Title: Science writers have a large role in the scientific society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.