थर्माकोलवर शास्त्रोक्त प्रक्रिया

By admin | Published: June 13, 2016 03:56 AM2016-06-13T03:56:23+5:302016-06-13T03:56:23+5:30

थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.

Scientific process of thermocolol | थर्माकोलवर शास्त्रोक्त प्रक्रिया

थर्माकोलवर शास्त्रोक्त प्रक्रिया

Next


ठाणे : ठाणे महापालिकेने कचऱ्याचे विघटन करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले असतानाच आता घनकचऱ्यातून थर्माकोल वेगळे करून यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणार असल्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन ७०० मेट्रीक टन कचरा जमा होतो. यामधून ओला व सुका कचरा वेगळा करून सुक्या कचऱ्याची पर्यावरण संवर्धनशील पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित आहे. ठाणे शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यातील थर्माकोलवर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रि या करून पुनर्वापर करण्याकरिता वार्षिक सरासरी १ टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारणी करून १० वर्षे चालवण्याबाबतचा प्रस्ताव जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली.
घनकचऱ्यातील थर्माकोलवरील पुनर्प्रक्रिया व पुनर्वापर, त्याचे व्यवस्थापन करणे, थर्माकोल कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्यासाठीची यांत्रिक व्यवस्था व मनुष्यबळाच्या खर्चाची बचत करणे, थर्माकोलचा कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये पडून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करणे आदी वैशिष्ट्ये या प्रकल्पाची असून अशा प्रकारचा प्रकल्प राबवणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिली महापालिका असल्याचे महापौरांनी सांगितले. हा प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात कार्यान्वित केल्यानंतर नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याची जागृती होईल. थर्माकोल व तत्सम पदार्थांवर प्रक्रिया केल्याने शहरातील नद्या, नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल. थर्माकोलमुळे होणारे प्रदूषण नियंत्रित राहील, डम्पिंग ग्राउंडपर्यंत वाहतुकीचा खर्च व मनुष्यबळ यामध्ये बचत होईल. या प्रकल्पाचा कोणताही भांडवली व महसुली भार महापालिकेवर पडणार नाही. शिवाय, या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम महापालिकेस महसूल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील प्रदूषणाचे प्रमाण काही प्रमाणात कमी करण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे भविष्यातदेखील नवनवीन तंत्रज्ञान वापरून अशा प्रकारचे प्रकल्प महापालिका कार्यक्षेत्रात राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Scientific process of thermocolol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.