शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

By admin | Published: May 18, 2016 03:23 AM2016-05-18T03:23:45+5:302016-05-18T03:23:45+5:30

त्रिवेणी गार्डन सोसायटीने पुढाकार घेत शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा निर्णय घेतला आहे.

Scientifically Rainwater Harvesting Project | शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प

Next


कल्याण : एकीकडे दिवसेंदिवस वाढत जाणारी पाणीटंचाई आणि दुसरीकडे खालावत चाललेली भूजल पातळी, अशा गंभीर पाशर््वभूमीवर पश्चिमेतील त्रिवेणी गार्डन सोसायटीने पुढाकार घेत शास्त्रोक्त पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा निर्णय घेतला आहे. त्याआधारे थोडे थोडके नव्हे तर तब्बल १० लाख ५० हजार लिटर पाणी जमिनीत जिरवण्यात येणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पुन्हा जमिनीत पाणी जिरवणारी ही पहिलीच सोसायटी ठरली आहे.
वारंवार भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येला इतर रहिवाशांप्रमाणे त्रिवेणी गार्डन सोसायटीतील रहिवासीही कंटाळले होते. त्यासाठी सोसायटी आवारात पाण्याची अजून एक टाकी बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला. परंतु महापालिकेकडून येणारे पाणीच त्यात सोडण्यात येणार होते. मात्र महापालिकेचे पाणीच नाही आले तर करायचे काय?, या विचाराने त्रिवेणी गार्डन ‘ए’ टाइपमधील रिहवाशांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष विजय सूचक यांनी दिली. विशेष म्हणजे कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनीही या निर्णयाला एकमताने पाठिंबा दिला. तर नगरसेवक वरु ण पाटील यांनीही या कामासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केल्याचे सूचक म्हणाले.
त्यानुसार रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रातील तज्ज्ञ केदार पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी आवारात कामही सुरू झाले आहे. यासाठी २४० चौरस फुटांची मोठी टाकी बांधण्यात येत आहे. त्यात पावसाचे सुमारे १० लाख ५० हजार लिटर पाणी साठवता येणार आहे.
एवढेच नव्हे तर या जमिनीत पाणी झरिपण्यासाठी चारही बाजूला छिद्र ठेवण्यात आली आहेत. तर टाकी भरल्यानंतर त्यातून वाहून जाणारे पाणी बाजूच्याच दोन बोरवेलमध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याचेही सूचक यांनी सांगितले. तर या टाकीत साठणारे पाणी शुद्ध करण्यासाठी डबर, कपची, खडी आणि कोळसे याचे विविध थर बनविण्यात येणार आहेत. एवढ्यावरच आम्ही थांबणार नाही. येत्या काळात पिण्यासाठी हे पाणी वापरता यावे, यासाठी आरओ प्लांटही बसवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
>अन्य सोसायट्यांनीही पुढाकार घ्यावा
हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागण्यात सचिव अलंकार किर्पेकर, खजीनदार सुहास आराध्ये, अविनाश विद्वांस, संजय पिंगळे, विनायक महाशब्दे यांच्यासह सोसायटीच्या सर्व सदस्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सूचक यांनी सांगितले. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून कल्याणमधील त्रिवेणी गार्डन सोसायटीने राबविलेला हा प्रकल्प पाहून शहरांतील इतर माठ्या सोसायट्याही त्यासाठी पुढाकार घेतील, अशी आशा आहे.
>निसर्गाची परतफेड करण्याची वेळ
इतके वर्ष आपण निसर्गाकडून पाणी घेतोच आहे, आणखी किती दिवस आपण नुसते घेत राहणार? आता आपण निसर्गाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. आणि हे शास्त्रोक्त पद्धतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग हा त्याचाच भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Scientifically Rainwater Harvesting Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.