कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2016 02:16 AM2016-10-08T02:16:15+5:302016-10-08T02:16:15+5:30
सध्या सर्वसाधारण भातपीक परिस्थिती उत्तम असून भातपीक फुलोऱ्यात असताना पडलेल्या पावसाने दाणे लालसर आढळून येत आहेत
अलिबाग : सध्या सर्वसाधारण भातपीक परिस्थिती उत्तम असून भातपीक फुलोऱ्यात असताना पडलेल्या पावसाने दाणे लालसर आढळून येत आहेत व कीड रोग नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ज्ञ डॉ. आर. बी. गोडसे यांनी दिला आहे.
कीड रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील
शास्त्रज्ञांच्या पथकाने कर्जत तालुक्यातील भातपिकाची प्रत्यक्ष पाहणी गुरुवारी केली. त्यानंतर डॉ.गोडसे यांनी हा निष्कर्ष दिला आहे.
पाहणीच्या वेळी खोपोली उपविभागीय कृषी अधिकारी पांडुरंग सिगेदार, कर्जत तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, कृषी अधिकारी वैभव विश्वे, कृषी पर्यवेक्षक पी.डी.जाधव व कीड रोग सर्वेक्षक रोशन घारे हे उपस्थित होते. त्यांनी कर्जत तालुक्यात लाखरण येथील विष्णू बाळू भामे व खांडपे येथील बाळू दगडू घारे व यशवंत तातू पाटील आदी उपस्थित होते. या टीमने विविध शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतांची पाहणी केली.
(विशेष प्रतिनिधी)
>पीक तयार होत आहे
डॉ.गोडसे म्हणाले, सध्या पीक वेगवेगळ्या अवस्थेत आहे. हळवे पीक तयार होत आले असून निमगरवे फुलोरा ते दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. पीक ९० टक्के तयार झाल्यावर पावसाची उघडीप पाहून कापणी करु न घ्यावी व तत्काळ सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. जेणेकरु न होणारे नुकसान टाळता येईल असे आवाहन त्यांनी केले आहे.