एमपीएससीला अचुकतेचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 10:42 PM2017-07-19T22:42:32+5:302017-07-19T22:42:51+5:30
हाराष्ट्र लोकसेवा आयागातर्फे (एमपीएससी) घेतलेल्या सर्वच परीक्षांना अचूक प्रश्न विचारण्यावर सर्वांचा विश्वास आहे.
औरंगाबाद, दि. 19 : महाराष्ट्र लोकसेवा आयागातर्फे (एमपीएससी) घेतलेल्या सर्वच परीक्षांना अचूक प्रश्न विचारण्यावर सर्वांचा विश्वास आहे. मात्र विविध पदांसाठी चालू वर्षांत घेतलेल्या चार परीक्षांमध्ये या विश्वासाला तडा गेल्याचे समोर आले आहे. परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी टाकलेल्या प्रथम उत्तरतालिका आणि अंतीम उत्तर तालीकेतील अचूक उत्तरांमध्ये तब्बल २० ते २५ मार्कांचा फरक दिसून आला आहे. या अचूकतेच्या बेफिकिरीवर आता विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०१७ या वर्षांत आतापर्यंत राज्य सेवा, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, मंत्रालय सहायक पदासाठी पूर्व परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विक्रीकर निरीक्षक पदासाठी (एसटीआय) २९ जानेवारी रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. आयोगाने या परीक्षेची ३१ जानेवारी रोजी प्रथम उत्तरतालीका वेबसाईटवर टाकली. यानंतर तीन महिन्यांनी याच परीक्षेची अंतीम उत्तरतालिका टाकण्यात आली. यामध्ये तब्बल ७ प्रश्न रद्द आणि ८ प्रश्नाचे उत्तरे बदलण्यात आले.
मात्र प्रथम उत्तरतालीकेनुसार राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेचा निकाल येणार असल्याचे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरूवात केलेली होती. मात्र अंतीम उत्तरतालिकामध्ये तब्बल १५ गुणांचा गोंधळ उडाला. याचा फटका मुख्य परीक्षेला संधी न मिळण्यात आणि आगामी दुसऱ्या पूर्व परीक्षेच्या तयारीवर होत आहे. स्पर्धा परीक्षेत झोकून दिलेल्या विद्यार्थ्यांचे सर्व नियोजनच बिघडते. मुख्य परीक्षेची तयारी सुरू असल्यामुळे पूर्वकडे दुर्लक्ष असते. यात मुख्यही जाते अन् पूर्वही जाते. शेवटी विद्यार्थ्यांच्या हाती निराशा पडते. हे सर्व एमपीएससीकडे असलेल्या अचुकतेच्या आभावामुळे घडत असल्याच्या तक्रारी ह्यलोकमतह्णला प्राप्त झाल्या आहेत.
याशिवाय १२ मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेनंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर केलेल्या प्रथम उत्तरतालिका आणि अंतीम उत्तरतालिकेतही तब्बल ५ प्रश्न रद्द, एका प्रश्नाचे उत्तर बदलण्यात आले. २ एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रथम आणि अंतिम उत्तरतालिकेत तब्बल ५ प्रश्न रद्द, ५ प्रश्नांचे उत्तर बदल करण्यात आले. यात तर सीसँटच्या प्रश्नांचाही समावेश असल्यामुळे पहिल्या आणि अंतीम उत्तरतालिकांमधील गुणांमध्ये तब्बल ३० गुणांचा फरक पडल्याचे आढळून आले आहे. याविषयी एमपीएससीचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.
- एमपीएससीने पीएसआय, एसटीआय आणि अॅसीसटंट पदासाठी १६ जुलै रोजी संयुक्त पूर्व परीक्षा १६ जुलै रोजी घेतली. या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका १७ जुलै रोजी जाहीर केली. या उत्तरतालिकेनुसार किमान १० प्रश्नांविषयी कन्फ्यूजन असल्याचा दावाही तक्रारकर्त्यां विद्यार्थ्यांनी केला आहे.
कोणत्याही पूर्व परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी प्रथम उत्तरतालिकेनुसार निकालची शक्यता वाटली की, उर्वरित तीन महिन्यात मुख्य परीक्षेची तयारी करतो. मात्र अचुक प्रश्नांच्या आभावामुळे सर्व अंदाज धुळीला मिळत आहे. याचा फटाक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना बसत आहे. किमान एमपीएससीकडून तरी अचूकतेची आपेक्षा आहे.
- गणेश साळवे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा विद्यार्थी