उन्हाचा तडाखा कायम
By admin | Published: April 23, 2015 05:13 AM2015-04-23T05:13:12+5:302015-04-23T05:13:12+5:30
उन्हाळ्यात पावसाळा अनुभवल्यानंतर आता पुन्हा उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. विदर्भात वर्धा येथे ४२.५, तर नागपूरमध्ये बुधवारी ४२.३ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली.
नागपूर : उन्हाळ्यात पावसाळा अनुभवल्यानंतर आता पुन्हा उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. विदर्भात वर्धा येथे ४२.५, तर नागपूरमध्ये बुधवारी ४२.३ अंश से. तापमानाची नोंद करण्यात आली.
दोनच दिवसांपूर्वी नागपूरचा पारा ४३ अंशावर गेला होता. बुधवारी त्यात थोडी घट होऊन तो
४२.३ अंशावर स्थिरावला. मात्र
तरीही उन्हाची तीव्रता प्रचंड होती. विदर्भात सर्वाधिक तापमानाची
नोंद वर्धा येथे (४२.५ अंश. से.) करण्यात आली. त्या खालोखाल नागपूरचे तापमान होते. गुरुवारी पारा आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भात नागपूर (४२.३), वर्धा (४२.५), अकोला (४१.३), अमरावती (४०.४), यवतमाळ (४०.५), बुुलढाणा (३९.५) आणि वाशीम मध्ये कमाल ३९.८ अंश सेल्सिअस तापमानची नोंद झाली.