उन्हाचा तडाखा झाला कमी
By Admin | Published: April 24, 2017 03:10 AM2017-04-24T03:10:52+5:302017-04-24T03:10:52+5:30
गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून विदर्भातील काही शहरांचा अपवाद
पुणे : गेल्या १५ दिवसांपासून संपूर्ण राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेची तीव्रता आता कमी झाली असून विदर्भातील काही शहरांचा अपवाद वगळता राज्यातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३़६ अंश तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७़८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ विदर्भातील चंद्रपूर, ब्रम्हपुरी, वर्धा, नागपूर परिसरात कमाल तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक आहे़ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे़
प्रमुख शहरांमधील तापमान :
पुणे ३६, जळगाव ३८़४, कोल्हापूर ३६़४़, महाबळेश्वर ३०़९, मालेगाव ३९़४, नाशिक ३५़१, सांगली ३७़६, सातारा ३६़७, सोलापूर ४०़१, मुंबई ३४़५, अलिबाग ३५़८, रत्नागिरी ३३, पणजी ३३़८, डहाणू ३४़१, औरंगाबाद ३७, परभणी ४०, नांदेड ४०़५, अकोला ४०़२, अमरावती ३७़८, बुलढाणा ३७़३, ब्रम्हपुरी ४३़५, चंद्रपूर ४३़६, नागपूर ४२़९, वर्धा ४२़४़, यवतमाळ ४०़ (प्रतिनिधी)