‘धूत ट्रान्समिशन’ विकत घेणार स्कॉटलंडची कंपनी

By admin | Published: June 23, 2017 02:09 AM2017-06-23T02:09:38+5:302017-06-23T02:09:38+5:30

जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘धूत ट्रान्समिशन’ या कंपनीने स्कॉटलंडमधील ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी

Scotland company to buy 'Dhoot Transmission' | ‘धूत ट्रान्समिशन’ विकत घेणार स्कॉटलंडची कंपनी

‘धूत ट्रान्समिशन’ विकत घेणार स्कॉटलंडची कंपनी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी ‘धूत ट्रान्समिशन’ या कंपनीने स्कॉटलंडमधील ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज लिमिटेड’ ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहाराचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नसून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे.
युरोपमध्ये व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे धूत ट्रान्समिशनला पश्चिम युरोपातील बाजारपेठेत अधिक जोरकसपणे प्रवेश करणे सुकर होईल. मुंबईस्थित गुंतवणूक बँक सिंगी अ‍ॅडव्हायजर्स हे या व्यवहाराचे सल्लागार आहेत.
युरोप व भारतातील वाहन आणि औद्योगिक क्षेत्रासाठी विद्युत उपकरणे पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या धूत ट्रान्समिशनची स्थापना १९९९ साली झाली. एक लघु उद्योग म्हणून सुरुवात केल्यानंतर वायर हार्नेसिंग क्षेत्रातील झपाट्याने वाढणारी कंपनी म्हणून धूत ट्रान्समिशनने नावलौकिक मिळविला. मागच्या १५ वर्षांत कंपनीचा सीएजीआर २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. आजमितीला कंपनीचे पुणे, औरंगाबाद, चेन्नई, मानेसर, पिथमपूर, इंग्लंड आणि स्लोव्हाकिया येथे १३ युनिटस् आहेत. व्होल्वो, पियाजियो, होंडा, बजाज आॅटो, रॉयल एनफिल्ड, सुझुकी आणि सीएनएच अशा स्थानिक व विदेशी कंपन्या धूत ट्रान्समिशनचे प्रमुख ग्राहक आहेत. तर, १९७१ साली स्थापन झालेल्या ‘टीएफसी केबल्स असेंब्लिज’चे स्कॉटलँड आणि स्लोव्हाकियामध्ये युनिटस् आहेत. ते वाहन उद्योगाला अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रूमेंटस्, वर्क अ‍ॅक्सेस प्लॅटफॉर्म, हिटिंग, व्हेंटिलेशन आणि कंट्रोल उपकरणे यासारखी उत्पादने पुरवितात.


जागतिक बाजारपेठेकडे वाटचाल - राहुल धूत
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत यांनी ‘टीएफसी’ खरेदीच्या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, जागतिक बाजारपेठेत कंपनीचे प्रस्थ वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल टाकले आहे. याआधीच कंपनीचा इंग्लंडमधील किंगस्टन अपॉन हल येथे कारखाना असून, एकूण उलाढालीच्या १५ टक्के निर्यात युरोप आणि इंग्लंडला केली जाते. आगामी तीन वर्षांत वार्षिक महसूल ६०० कोटींवरून १२०० कोटी रुपये करण्याचा मानस आहे. ‘टीएफसी’च्या खरेदीमुळे कंपनीच्या महसुलात १०० कोटी रुपयांची भर पडणार असून, पहिल्याच वर्षापासून नफ्यात वाढ दिसून येईल. यावर्षी ‘टीएफसी’व्यतिरिक्त इंग्लंडमधील आणखी एक कंपनी आम्ही खरेदी करणार असून, त्याविषयीच्या वाटाघाटी सुरू आहेत.

Web Title: Scotland company to buy 'Dhoot Transmission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.