खरेदी बंदमुळे भंगार बसेस रस्त्यावर

By admin | Published: June 15, 2017 02:05 AM2017-06-15T02:05:59+5:302017-06-15T02:05:59+5:30

तोटा होत असल्याच्या नावाखाली नव्या बसची खरेदी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बंद केली आहे. परिणामी, जुन्या खिळखिळ्या झालेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत.

Scrap buses on the streets due to the shutdown of the purchase | खरेदी बंदमुळे भंगार बसेस रस्त्यावर

खरेदी बंदमुळे भंगार बसेस रस्त्यावर

Next

प्रशांत हेलोंडे । लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तोटा होत असल्याच्या नावाखाली नव्या बसची खरेदी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बंद केली आहे. परिणामी, जुन्या खिळखिळ्या झालेल्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. राज्यातील तब्बल ४० टक्के बसेस ‘आउट डेटेड’ झाल्याची माहिती खुद्द महामंडळाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडे तब्बल १६ हजार एसटी बसेस आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे एक हजार नवीन बसेसची खरेदी केली जाते व तेवढ्याच बसेस मोडीत काढल्या जातात, पण मागील वर्षी नवीन बसेसच्या खरेदीचे धोरण बदलले गेले.
आधीच्या धोरणानुसार किलोमीटर आणि वर्षांचा हिशेब ग्राह्य धरून, जुन्या बसेस भंगारात काढण्याचे प्रमाण ठरविले जात होते. हे प्रमाण लक्षात घेतले, तर बहुतांश बसेस मोडीत काढण्याच्या स्थितीत आहेत, पण नवीन बसेस उपलब्ध होत नसल्याने, त्याच एसटीकडून सेवा घेतली जात आहे.

दहा महिन्यांपासून खरेदी बंद आहे. यामुळे जिल्ह्याला एकही नवीन बस मिळालेली नाही. नवीन बससाठी प्रस्ताव पाठविला आहे, पण खरेदीच बंद असल्याने जुन्याच बसेस प्रवाशांच्या सेवेत रूजू आहेत.
- अविनाश राजगुरे, प्रभारी, विभाग नियंत्रक, रापम, वर्धा

Web Title: Scrap buses on the streets due to the shutdown of the purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.