सागरी मार्गास हिरवा कंदिल

By admin | Published: September 29, 2016 02:37 AM2016-09-29T02:37:06+5:302016-09-29T02:37:06+5:30

महत्त्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पाचा बार निवडणूकीपूर्वी उडवण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात सत्तेत असल्याने सागरी मार्गासाठी आवश्यक सर्व परवाने, ना

Sea lanes green lattice | सागरी मार्गास हिरवा कंदिल

सागरी मार्गास हिरवा कंदिल

Next

मुंबई : महत्त्वाकांक्षी सागरी मार्ग प्रकल्पाचा बार निवडणूकीपूर्वी उडवण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्यात सत्तेत असल्याने सागरी मार्गासाठी आवश्यक सर्व परवाने, ना हरकत प्रमाणपत्र झटपट मिळवण्यात येत आहे.
नुकतेच नाविक दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सागरी अभियंत्याकडून या प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळाला आहे.
या प्रकल्पाला मच्छिमार, पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. तसेच विविध सरकारी विभागांच्या लालफितीत हा प्रकल्प गेली काही वर्षे अडकला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सागरी अभियांत्रिकी विभागानेही काही अटी घालूनच ना हरकत प्रमाणपत्र दिले होते.
ज्यामध्ये सागरी किनाऱ्यावरील ट्रायपॉड हलवताना मनुष्य आणि वित्तहानी होणार नाही याची काळजी घेणे, सागरी किनाऱ्याची सुरक्षितता अबाधित ठेवणे या अटींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sea lanes green lattice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.