कार्यालय सील करा!
By admin | Published: July 29, 2016 03:35 AM2016-07-29T03:35:25+5:302016-07-29T03:35:25+5:30
मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री
मुंबई : मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप क्रेडीट सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करुन दोषी असणाऱ्या संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. या संस्थेचे कार्यालयसुद्धा सील करण्याचे आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को आॅप सोसायटीतील संचालक मंडळाकडून गैरकारभार सुरु असल्याची तक्रार सुधाकर देशमुख यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात केली. सोसायटीत निवडणूक घेण्यात आलेली नाही. सन २००८ ते २०१५ या काळात देण्यात आलेल्या कर्जाचा तपशिल सोसायटीकडे नाही. सोसायटीचे चेअरमन स्वत:ची
रक्कम गुंतवून आपला उद्योग करीत आहेत.
संस्थेच्या दप्तराची तपासणी करण्यात आली असता उपलब्ध कागदपत्राच्या आधारे तपासणी केली असता तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळले, त्यामुळे सहायक निबंधक यांच्या आदेशानुसार संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून लेखापरीक्षक अनिरुद्ध सेनगांवकर यांची नियुक्त करण्यात आली होती. परंतु त्यास विभागीय सहनिबंधक मुंबई यांनी स्थगिती दिली, अशी माहितीही मंत्री देशमुख यांनी सभागृहाला दिली. (प्रतिनिधी)
आॅडीट झालेले नाही
संस्थेचे आॅडीट झालेले नाही. यासंदर्भात सोसायटीचे सचिवांनी सहायक निबंधकाकडे तक्रार केली आहे. या गैरव्यवहाराकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, म्हणून तातडीने संचालकमंडळ बरखास्त संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली होती.