पेट्रोलपंपावरील घोळावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 04:01 AM2017-08-05T04:01:10+5:302017-08-05T04:01:13+5:30

राज्यभरातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांवरून पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि अन्य साहित्याचा फोरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यापैकी बहुतांश अहवालांतून हेराफेरीवर शिक्कामोर्तब झाल्याने पंपमालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

 Seal on a petrol pump | पेट्रोलपंपावरील घोळावर शिक्कामोर्तब

पेट्रोलपंपावरील घोळावर शिक्कामोर्तब

Next

ठाणे : राज्यभरातील घोटाळेबाज पेट्रोलपंपांवरून पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि अन्य साहित्याचा फोरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यापैकी बहुतांश अहवालांतून हेराफेरीवर शिक्कामोर्तब झाल्याने पंपमालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
पेट्रोलपंपावरील डिस्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिप लावून ग्राहकांना कमी इंधन देणाºया टोळीचा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला. पोलिसांनी राज्यभरातील १६१ पेट्रोलपंपांवर छापे टाकले. त्यापैकी ९० पंपांवर हेराफेरी आढळली. हेराफेरीसाठी वापरलेले २६२ पल्सरकार्ड, २० सेन्सरकार्ड, १११ कंट्रोलकार्ड, १९९ की-पॅड या पंपांवरून जप्त केलेले साहित्य फोरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. प्रयोगशाळेचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले असून बहुतांश साहित्यामध्ये हेराफेरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालाने पोलिसांची कारवाई योग्य असल्यावरही शिक्कामोर्तब केले आहे. अहवालामुळे आता पंपमालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title:  Seal on a petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.