मतदान यंत्रे सील करणारी राजमुद्रा हटविली

By admin | Published: October 17, 2014 01:03 AM2014-10-17T01:03:42+5:302014-10-17T01:03:42+5:30

निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा.

The sealed seal of polling machines has been deleted | मतदान यंत्रे सील करणारी राजमुद्रा हटविली

मतदान यंत्रे सील करणारी राजमुद्रा हटविली

Next

सामान्य सील आणले : ‘एम’ अक्षराच्या शिक्क् ्यांचा वापर
गणेश वासनिक - अमरावती
निवडणुकीच्या कामकाजात पारदर्शकता राहावी, यासाठी प्रारंभीपासून मतपेटी, मतदान यंत्र सील करण्यासाठी लाखेच्या वापर केला जातो. सील करताना राजमुद्रा असलेल्या चिन्हाचा वापर केला जायचा. मात्र यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत सामान्य मुद्रा असलेले चिन्ह सील करताना वापर होत आहे.
१९५२ ते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतयंत्रे, पॅकेट, मतपेटी आदी साहित्यावर मोहोर लावून ते सील करताना राजमुद्रा असलेले चिन्ह असणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सील करताना सामान्य चिन्ह असलेली 'एम' मुद्रा वापरण्यात आल्याने याचा अर्थ काय समजावे, हा प्रश्न पडला आहे. राजमुद्रा हटविण्याचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांनी घेतला हे कळेनासे झाले आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे.
अचानक १९५२ नंतर विधानसभा निवडणुकीत राजमुद्रेऐवजी सामान्य चिन्हाचे सील करण्याचा निर्णय आयोगाने कोणाच्या आदेशानुसार घेतला, हे गुलदस्त्यात आहे. निवडणुकीत साहित्य सील करताना राजमुद्रा हटविण्यात आल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याचा अटीवर दिली आहे. मतपेटी, मतयंत्रे, पॅकेट आदी साहित्य सील करताना सामान्य चिन्हाचे सील लावण्यामागे कोणाचे डोके आहे, हे देखील संशोधनाची बाब आहे. पूर्वी राजमुद्रेचे चिन्ह असलेली धातुची मोहोर सील करुन ते साहित्य सुरक्षेत ठेवले जायचे. सील झाल्यानंतर ठळकपणे राजमुद्रा उमटायची. परंतु आता सामान्य चिन्ह असलेली धातुची मोहोर सील करण्यासाठी वापरली जात आहे.
राजमुद्रेऐवजी उमटते ‘एम’
मतयंत्रे, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, महत्त्वाचे लिफाफे सील करण्यासाठी नवीन शिक्क् ्यांचा पहिल्यांदाच वापर होत आहे. लाकडी मूठ असलेला हा शिक्का धातूची मोहोर (मेटेल सील) उमटविण्यासाठी आहे. मात्र सील करताना राजमुद्रेऐवजी ‘एम’ व प्रोसेडिंग आॅफिसर, असे उमटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने सामान्य सील करण्याचा निर्णय कोण्याचा आदेशाने घेतला, हे शोधून काढणे गरजेचे आहे.

Web Title: The sealed seal of polling machines has been deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.