आघाडीवर शिक्कामोर्तब!
By admin | Published: August 7, 2014 02:44 AM2014-08-07T02:44:16+5:302014-08-07T02:44:16+5:30
स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Next
>सोनिया गांधी-पवार यांची चर्चा
जागावाटप मुंबईतच होणार, गुंते दिल्लीत सोडवू
समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करणार
नवी दिल्ली : स्वबळावर लढण्याची भाषा करून महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार करू पाहणारी राष्ट्रवादी काँग्रेस अखेर आगामी विधानसभा काँग्रेससोबतच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 144 जागांचा हट्ट सोडत बुधवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि आघाडीवर शिक्कामोर्तब केले. जागावाटपाची प्राथमिक चर्चा राज्यात करावी आणि ज्या जागांवर तिथे तडजोड होणार नाही, तो गुंता राजधानीत सोडवावा, असे ठरले.
सूत्रंनी सांगितले, पवार यांनी सोनिया गांधी यांना सांगितले, आम्ही ज्या 14क् जागांची अपेक्षा ठेवली आहे, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस 125 ते 13क् जागांवर बलाढय़ आहे, तर त्यातीलच 13 ते 15 जागांवर काँग्रेसची ताकद कमी आहे. त्या जागांची काळजी घ्यावी लागेल. काही समविचारी पक्षांना आघाडीत सहभागी करून घेतले तर, त्यांचा फायदा दोघांनाही होईल. मात्र, हा मुद्दा काँग्रेसला मान्य नाही असे नाही, पण त्यांना द्यायच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटय़ातून द्याव्या, असे लागलीच काँग्रेसने स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डी.पी. त्रिपाठी यांनी लोकमतला सांगितले, आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. कोणताही संभ्रम यापुढे राहणार नाही. जागावाटपाबाबतची चर्चा मुंबईत होईल, ज्या जागांबाबत एकमत होणार नाही, ते मुद्दे दिल्लीत सुटतील. (विशेष प्रतिनिधी)
विधानसभा निवडणूक आघाडी करून लढू, असा प्रस्ताव देऊन कोणत्याही स्थितीत स्वबळाची भाषा आता होणार नाही, असे अभिवचन पवार यांनी सोनिया गांधी यांना दिले. समविचारी पक्षांना आपल्या आघाडीत सहभागी करून घेतल्यास त्याचा फायदा होईल, अशी भूमिकाही त्यांनी 1क् जनपथवर मांडली.
राष्ट्रवादीच्या धमकीमुळे भेटीला महत्त्व
1क् जनपथ या सोनिया यांच्या निवासस्थानी पवार यांनी त्यांची सकाळी 1क् वाजता भेट घेतली. तब्बल 4क् मिनिटे ही चर्चा झाली. राज्यातील जागावाटपाबाबत 5क् टक्क्यांचे सूत्र काँग्रेस मान्य करत नसेल, तर आम्ही स्वतंत्रपणो लढायला मोकळे आहोत, अशी थेट धमकीच गेल्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाला दिली होती़ त्या पाश्र्वभूमीवर पवार यांच्या भेटीला राजधानीत महत्त्व प्राप्त झाले होते.
प्रस्थापित मंत्र्यांविरुद्ध ‘स्वाभिमानी’ला लढू द्या
पुणो : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रस्थापित आठ मंत्र्यांचे मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. ही संघटना अवास्तव जागा मागत असल्याचा अपप्रचार सुरू आहे. गेल्या निवडणुकीत 38 पैकी 16 जागांवर सेना-भाजपाचे उमेदवार तिस:या क्रमांकावर होते, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.