गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:05 AM2018-05-31T07:05:52+5:302018-05-31T07:05:52+5:30

राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत

The search for the smart officers in the secret negotiation department | गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

गुप्त वार्ता विभागाला चाणाक्ष अधिकाऱ्यांचा शोध

googlenewsNext

जमीर काझी
मुंबई : राज्य गुप्त वार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी गट-क या दर्जाची तब्बल २०४ पदे भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही सर्व पदे मुंबई विभागातील आहेत. त्यासाठी सुशिक्षित तरुणांना आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. यासाठी १२ जूनपर्यंत मुदत आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई हे शहर नेहमीच अतिरेक्यांच्या ‘टार्गेट’वर राहिले आहे. रोज नागरिकांचे हजारो लोंढे उदरनिर्वाहानिमित्त मुंबईत येतात. महानगराची लोकसंख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. त्या तुलनेत दहशतवादी संघटना, राजकीय, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावर नजर ठेवून गुप्त माहिती मिळविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तोकडे पडत आहे. त्यामुुळे या ठिकाणी सहायक अधिकाºयांची आवश्यकता असल्याने, आयुक्त संजय बर्वे यांनी मुंबई विभागांतर्गत सहायक अधिकारी गट-क या दर्जाची २०६ पदे भरण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. त्याला हिरवा कंदील मिळाला आहे.
या पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून, खुल्या गटासाठी ३० वर्षे व मागास उमेदवारासाठी ३३ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. महाराष्टÑ राज्य सरकारच्या संकेतस्थळावर या पदाच्या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी ८२ पदांची भरती
थेट सहायक गुप्त वार्ता अधिकारी वर्ग-२ ची (एसआयओ) २००९ मध्ये ८२ पदे भरण्यात आली होती. त्यापैकी सध्या ५८ जण विभागात कार्यरत आहेत. उर्वरित अधिकारी राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परीक्षा देऊन उपअधीक्षक, उत्पादन शुल्क अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार बनले आहेत.
प्रधान समितीचा अहवाल
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्त वार्ता विभागाचा फोलपणा चव्हाट्यावर आला होता. विशेषत: ‘ग्राउंड लेव्हल’ला माहिती मिळविणारी यंत्रणा व सक्षम अधिकारी नसल्याचे ताशेरे हल्ल्याच्या चौकशीबाबत नेमलेल्या प्रधान समितीने अहवालात ओढले होते. त्यामुळे विभागाकडून गेल्या नऊ वर्षांत सहायक अधिकारी गट-क या पदाची तीन वेळा भरती करण्यात आली आहे.

अशी होणार भरती
सहायक गुप्त वार्ता अधिकाºयासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून, पुरुषांसाठी १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी उंची असणे आवश्यक आहे. एकूण २०४ पदांपैकी ९८ पदे ही खुल्या गटासाठी असून, उर्वरित १०६ पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. आॅनलाइन अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणवत्ता यादी निश्चित करून मुलाखतीनंतर अंतिम निवड यादी जाहीर
केली जाईल. या परीक्षेबाबतची माहिती उमेदवाराला ई-मेल करून दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांकडून तीन वर्षांचा बाँड लिहून घेतला जाणार आहे. या कालावधीत त्यांनी राजीनामा दिल्यास व्यवसायिक प्रशिक्षणाचा सर्व खर्च, त्या काळातील वेतन भरून घेतला जाणार आहे.

Web Title: The search for the smart officers in the secret negotiation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.