आव्हाड धमकीपत्राचा शोध सुरू

By Admin | Published: March 10, 2015 04:10 AM2015-03-10T04:10:32+5:302015-03-10T04:10:32+5:30

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या कथित धमकीपत्राचा सध्या नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण

Searching for the Avhad threat | आव्हाड धमकीपत्राचा शोध सुरू

आव्हाड धमकीपत्राचा शोध सुरू

googlenewsNext

ठाणे : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या कथित धमकीपत्राचा सध्या नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास केला जात आहे. त्यांना पुरेसे संरक्षण देण्यात आले असून धमकीतील हस्ताक्षराचे संशोधन केले जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
या आंतर्देशीय पत्रात म्हटले आहे की, ‘हे नथुराम चक्र आहे. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आता नंबर जितेंद्र आव्हाड आपला आहे. तुमचा निकाल लवकरच लागेल. हा महाराष्ट्र श्री. नथुराम गोडसे विचारसरणीचा आहे, हे आम्हाला पटवून द्यायचे आहे. ही आमची बांधिलकी आहे. हे पत्र नव्हे प्रतिज्ञापत्र आहे.’ असा उल्लेख पत्रात आहे.
शेवटी ‘आपला नम्र, नथुराम विचार मंच,’ असेही लिहिण्यास धमकी देणारा विसरलेला नाही. या धमकीची ठाणे पोलिसांनी दखल घेतली असून गुन्हे अन्वेषण विभागाबरोबरच नौपाडा पोलीसही तपास करीत असल्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. अशा प्रकारचे हस्ताक्षर कोणाचे असू शकते, कोण पत्र लिहू शकते, अशी कोणती संघटना अस्तित्वात आहे का, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. आ. आव्हाड यांना वाय दर्जाची सुरक्षा आधीच पुरविण्यात आलेली आहे. त्यांच्या घरीही संरक्षण देण्यात आले असल्याची माहिती मणेरे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यांना यापूर्वीही दोनदा धमकी आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Searching for the Avhad threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.