४२ कृषिसेवा केंद्रांत संशयास्पद बियाणे!
By admin | Published: June 9, 2016 05:57 AM2016-06-09T05:57:07+5:302016-06-09T05:57:07+5:30
गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथकाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये केलेल्या तपासणीत ४२ ठिकाणी विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळले आहेत.
खामगाव (जि. बुलडाणा) : गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथकाने जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांमध्ये केलेल्या तपासणीत ४२ ठिकाणी विशिष्ट लॉट नंबरचे संशयास्पद बियाणे आढळले आहेत. त्यामुळे या बियाणांची विक्री बंद करण्याचे आदेश कृषिसेवा केंद्रांना देण्यात आले आहेत.
खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होताच बी-बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार करणऱ्यांचे टोळकेही सक्रिय होते. प्रमाणित व नामांकित बियाण्याच्या नावावर बनावट बियाणे आणि रासायनिक खतांची शेतकऱ्यांना विक्र ी केली जाते. त्यामुळे बियाणे-खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर गुणवत्ता नियंत्रण पथक नेमण्यात येते. दुष्काळाचा सामना करून आता मशागतीकडे वळलेल्या शेतकऱ्यांनी बियाणे-खत खरेदी करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)