Maharashtra Politics: “जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो”; सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 01:22 PM2023-03-26T13:22:49+5:302023-03-26T13:23:32+5:30

Maharashtra News: आगमी लोकसभा निवडणुकीत २२ आणि विधानसभेला १२६ जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका शिंदे गटाने घेतल्याचे सांगितले जात आहे.

seat allocation formula is not decided on television sudhir mungantiwar replied shinde group | Maharashtra Politics: “जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो”; सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावले

Maharashtra Politics: “जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो”; सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावले

googlenewsNext

Maharashtra Politics: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाली आहे. अधिवेशन काळात अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू पक्षांची मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच शिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो, असा पलटवार भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप अनेक महिने आहेत. यासाठीची आतापासूनच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाला आगमी लोकसभा निवडणुकीत २२ आणि विधानसभेला १२६ जागा मिळाल्याच पाहिजेत, अशी भूमिका खासदार गजानन किर्तीकर यांनी घेतली. अलीकडेच संजय राऊत यांच्याऐवजी गजानन कीर्तीकर यांनी संसदेत गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. गजानन कीर्तीकरांच्या भूमिकेला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. 

जागावाटपाचा फॉर्म्युला असा टीव्हीवर ठरत नसतो

कोणतेही राजकीय सूत्र हे तर्कसंगत ठरवावे लागते. जिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील त्या जागा त्यांनी घेतल्याच पाहिजेत आणि भाजपने त्या त्यांना दिल्याच पाहिजेत. तसेच भाजपलाही त्यांच्या जागा मिळायला पाहिजेत. आमचे सरकार हे प्रगती करणारे सरकार असले पाहिजे. आमचे लक्ष्य मंत्रालयाचा सहावा मजला असता कामा नये. आमचे लक्ष्य भामरागडमधला शेवटचा आदिवासी बांधव असला पाहिजे. म्हणून जागावाटप हे काही टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून शंभर टक्के ठरणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितले. 

...तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही

निवडणूक तर एक वर्षावर आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला हा माईकवरून, पत्रकार परिषदेतून, टीव्ही चॅनेलवरून कधीच ठरत नाही. केंद्रात अमितभाई शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी एकत्र बसतील. जागावाटपाचा फॉर्म्युला पत्रकार परिषदेत ठरायला लागला, जाहीर सभेत ठरायला लागला तर हे काही पोषक वातावरण होऊ शकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: seat allocation formula is not decided on television sudhir mungantiwar replied shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.