दुस-या दिवशीही महिलांना त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहात जाण्यापासून रोखले
By admin | Published: April 14, 2016 03:48 PM2016-04-14T15:48:22+5:302016-04-14T15:48:47+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना सलग दुस-या दिवशी, गुरूवारीही रोखण्यात आले
Next
>ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. १४ - त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना सलग दुस-या दिवशी, गुरूवारीही रोखण्यात आले. यावेळी महिला आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.
स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात उंब-यापासून दर्शन करून जाऊ लागताच पुजारी व इतरांनी त्यांना आत जाण्यास रोखले. यावेळी महिला संघटनेचे नेतृत्व करणा-या वनिता गुट्टे यांनी नागरिकांनीच आपल्याला रोखल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ मंदिरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वनिता गुट्टे या त्र्यंबकेश्वरहून नाशिक येथे जिल्हाधिकारी दीपेंदसिंह कुशवाह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या आहेत.