औरंगाबादमध्ये विद्यापीठात प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या, महिनाभरातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:44 PM2017-09-12T15:44:31+5:302017-09-12T15:54:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात गणेश शंकरराव कोपरवाड (23) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना त्याने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे.
औरंगाबाद, दि, 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात गणेश शंकरराव कोपरवाड (23) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश हा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात प्रथमवर्षात शिक्षण घेत होता. पोलिसांना त्याने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून त्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्येची याच वसतिगृहातील हि महिनाभरात दुसरी घटना घडल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे.
याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक 1 च्या खोली क्रमांक 98 मध्ये गणेश वास्तव्यास होता. गणेशचे रुममेट सकाळी नेहमीप्रमाणे लेक्चरसाठी आपाआपल्या विभागात गेली तर गणेश रूमवरच थांबला होता. दुपारी १ च्या दरम्यान त्याचे रुममेट वसतिगृहात आले असता त्यांना रूमचा दरवाजा बंद दिसला. दाराच्या फटीमधून त्यांनी पाहिले असता गणेश याने गळफास घेतलेले दिसले. तेव्हा इतर मित्रांच्या मदतीने त्यांनी दरवाजा रूमचा दरवाजा तोडला. यानंतर त्याला घाटी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांना गणेश याने लिहलेली सूसाइड नोट मिळाली असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरु आहे. प्रेमप्रकरणातून गणेश ने आत्महत्या केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गणेश याच्या फेसबुकवर शेवटची पोस्ट ' आय हेट गर्ल्स 'अशी होती. याच वसतिगृहात मागील महिन्यात 29 तारखेला अमोल काकडे या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातूनच आत्महत्या केली होती.