शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 04:31 PM2024-10-26T16:31:24+5:302024-10-26T16:39:01+5:30

NCP Sharad Pawar Group : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर झाली असून २२ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Second list of NCP Sharad Pawar group has been announced and 22 candidates have been announced | शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी

शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी

Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधी शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. या यादीमधून बीडमधील सस्पेन्स संपला असून येथून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. इतर उमेदवारांची नावे आज रात्री किंवा उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं. आमच्यातील सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त मतदान घेऊन निवडून येतील असा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

दुसऱ्या यादीमध्ये,बीडमधून संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर अकोल्यामधून  अमित भांगरे,  एरंडोलमधून सतिश पाटीलस गंगापूरमधून सतिश चव्हाण, पार्वतीमधून अश्विनी कदम, माळशिरस येथून उत्तम जाणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर शरद पवार गटाने छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही उमेदवार दिला आहे. येवला मतदारसंघातून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२२ उमेदवारांची नावे

एरंडोल -सतीश अण्णा पाटील
गंगापूर - सतीश चव्हाण
शहापूर - पांडुरंग बरोरा
परांडा - राहुल मोटे
बीड - संदीप क्षीरसागर
आर्वी - मयुरा काळे
बागलाण - दीपिका चव्हाण
येवला - माणिकराव शिंदे
सिन्नर - उदय सांगळे
दिंडोरी - सुनीता चारुसकर
नाशिक पूर्व - गणेश गीते
उल्हासनगर - ओमी कलाणी
जुन्नर - सत्यशील शेरकर
पिंपरी - सुलक्षणा शिलवंत
खडकवासला - सचिन दोडके
पर्वती - अश्विनी कदम
अकोले - अमित भांगरे
अहिल्यानगर शहर - अभिषेक कळंबकर
माळशिरस - उत्तम जानकर
फलटण - दीपक चव्हाण
चंदगड - नंदिनी बाभुळकर- कुपेकर
इचलकरंजी - मदन कारंडे

Web Title: Second list of NCP Sharad Pawar group has been announced and 22 candidates have been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.