खर्डी-महाड पाणलोट प्रकरणी दुसरा गुन्हा
By admin | Published: March 2, 2015 02:12 AM2015-03-02T02:12:59+5:302015-03-02T02:12:59+5:30
तालुक्यातील खर्डी या गावात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन वनराई संस्था पुणे व कृषी अधिकारी महाड यांच्यामार्फत करण्यात आलेल्या
महाड : तालुक्यातील खर्डी या गावात एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन वनराई संस्था पुणे व कृषी अधिकारी महाड यांच्यामार्फत करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात २२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. याबाबत पोलिसांत तक्रार देऊ नये, म्हणून संदेश महाडीक याला गावकीच्या सभेत मारहाण करून ‘वाळीत टाकण्याची’ धमकी दिल्याचेही चव्हाट्यावर आले होते.
त्याच गावांतील शेतकरी बाबासाहेब गोविंद महाडीक यांच्या नावावर ४ लाख २ हजार हजार ७२१ रुपयांची खोटी बिले तयार करुन ही रक्कम परस्पर लंपास केली. त्याने शेतकऱ्याची व सरकारची फसवणूक केल्या प्रकरणी गेल्या २६ फेब्रुवारी रोजी रितसर तक्रार दाखल करण्याकरिता बाबासाहेब महाडीक गेले असता, महाड तालुका पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. अखेर २८ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता महाड तालुका पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीकरिता व संगनमताकरिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे.