आठ शहरे दुसऱ्या टप्प्यात ‘स्मार्ट’

By admin | Published: January 31, 2016 01:46 AM2016-01-31T01:46:15+5:302016-01-31T01:46:15+5:30

स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.

In the second phase of eight cities 'smart' | आठ शहरे दुसऱ्या टप्प्यात ‘स्मार्ट’

आठ शहरे दुसऱ्या टप्प्यात ‘स्मार्ट’

Next

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली

स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे.
स्मार्ट सिटीजच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत देशातील ५४ व महाराष्ट्रातील ८ शहरांचा समावेश असून, १ एप्रिल २0१६ रोजी ही स्पर्धा सुरू होईल. त्यासाठी शहरांना विकास योजना व प्रकल्प ३0 जूनपर्यंत नव्याने सादर करायचे आहेत. दुसऱ्या टप्प्याचा निकाल आॅगस्टमध्ये लागेल आणि ५४ पैकी अंदाजे ४0 शहरांची स्मार्ट सिटीजसाठी निवड होईल. स्मार्ट सिटीजसाठी ९७ स्पर्धक शहरांचे गुणवत्तेनुसार मूल्यमापन जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, लंडन स्कूला आॅफ इकॉनॉमिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अर्बन अ‍ॅफेअर्स आदी संस्थांच्या तज्ज्ञांनी काटेकोर निकषांवर व पारदर्शी पद्धतीने केले. त्यात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या २0 शहरांची पहिल्या टप्प्यात निवड झाली. अन्य स्पर्धक शहरांनाही त्यांच्या १00 पैकी गुण व क्रमांक देण्यात आले. पहिल्या २0 शहरांना २0१५-१६ या आर्थिक वर्षापासून स्मार्ट सिटीज मिशनतर्फे नियोजित विकासासाठी आर्थिक सहाय्य सुरू होईल. त्या शहरांच्या विकासाचा अग्रक्रम, तज्ज्ञांच्या सूचना व सल्ल्यानुसार ठरेल.
नियोजित वेळेत त्याची पूर्तता महापालिकांना करावी लागेल. स्मार्ट सिटीजच्या प्रकल्पांच्या पूर्ण होण्याची मुदत ठरलेली असेल. प्रकल्प अमलबजावणीत विलंब करणाऱ्या शहरांना स्मार्ट मिशनमधून बाहेर काढले जाईल. काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील शहरांना पहिल्या स्पर्धेत संधी मिळाली नाही. त्यामुळे २३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील २३ शहरांना प्रस्ताव दुरूस्त करण्यास एक संधी मिळेल.

राज्यातील ८ शहरांचा क्रमांक व गुण
शहरक्रमांक गुण
नागपूर ३१ ५३%
नाशिक ३४ ५२.७५%
ठाणे ३६ ५२.३४%
कल्याण-डोंबिवली३८ ५२.३0%
मुंबई ४३५१.७७%
नवी मुंबई४५ ५१.६८%
अमरावती ६४४५.५७%
औरंगाबाद ७७४५.७0%

20 शहरांची निवड पहिल्या टप्प्यात निवड झाली, त्यात निवड झालेल्या पुणे आणि सोलापूर या दोन शहरांनी अनुक्रमे ७७.४२ टक्के आणि ६0.८३ टक्के गुण मिळवून दुसरा आणि नववा क्रमांक पटकवला होता.

Web Title: In the second phase of eight cities 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.