कुख्यात सिद्दिकीवरील गोळीबाराचे रहस्य कायम!

By admin | Published: December 4, 2014 02:31 AM2014-12-04T02:31:43+5:302014-12-04T02:31:43+5:30

चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगार व कोळसामाफिया शगीर सिद्दिकी याच्यावर नागपुरात मंगळवारी दुपारी चालत्या कारमध्ये झालेल्या गोळीबाराचे रहस्य

The secret of the notorious Siddiqi firing remains intact! | कुख्यात सिद्दिकीवरील गोळीबाराचे रहस्य कायम!

कुख्यात सिद्दिकीवरील गोळीबाराचे रहस्य कायम!

Next

चंद्रपूर/ नागपूर : चंद्रपुरातील कुख्यात गुन्हेगार व कोळसामाफिया शगीर सिद्दिकी याच्यावर नागपुरात मंगळवारी दुपारी चालत्या कारमध्ये झालेल्या गोळीबाराचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शगिरच्या साथीदारांकडून कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी शगीरची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. दुसरीकडे घग्गुस येथे या गोळीबारासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शागिर (३२) हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्णातील घुग्गुस येथील रहिवासी आहे. हाजी शेख सरवर या मोस्ट वॉन्टेड कोलमाफियाचा तो राईट हॅण्ड मानला जातो. हाजीचा समर्थक हेमंत दियेवार याची दोन वर्षांपूर्वी शेखू गँगने बजाजनगर चौकात गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून शागीरच नागपुरातून कोळसा तस्करी आणि खंडणीचे नेटवर्क नियंत्रित करीत आहे. कोळशाच्या तस्करीतून त्याने खूप पैसा जमविला आहे. पांढराबोडी येथील कुख्यात गुन्हेगार शक्ती मनपिया याला त्याने आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले होते. ताजबागचा कुख्यात जाकीर खानसह अनेक गुन्हेगार शागीरसोबत राहत होते. मंगळवारी दुपारी १२.११ वाजता घटनेच्या वेळी सुद्धा त्याचे दोन्ही साथीदार सोबत होते. याप्रकरणी शगिरच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु त्यांच्याकुडून अद्याप कुठलीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
सिद्धीकी कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करण्याचा व्यवसाय करतो. कोळसा खाण क्षेत्रात त्याची दबंगगीरी आहे. कोलमाफियामध्ये वर्चस्व व्हावे यासाठी अनेकवेळा वेकोलि अधिकाऱ्याला धमकी देण्याचे प्रकारही घडले आहे. सिद्धीकीवर घुग्घूस पोलिसात दोन खुनाचे प्रयत्न, एक जीवे मारण्याची धमकी, दोन दंगा, एक शिरपूर पोलिसात तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दोन वर्ष तो तडीपार होता. (प्रतिनिधी)

Web Title: The secret of the notorious Siddiqi firing remains intact!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.