गृहराज्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा
By admin | Published: August 3, 2016 05:22 AM2016-08-03T05:22:00+5:302016-08-03T05:22:00+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही गोपनीय दौरा करत भांबोरा व नांदगाव शिंगवे येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेतली
अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही गोपनीय दौरा करत भांबोरा व नांदगाव शिंगवे येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले़ केसरकर सोमवारी रात्री साडेदहा वाजता भांबोऱ्यात तर रात्री दीड वाजता नांदगाव शिंगवे येथे आल्याने त्यांच्या दौऱ्याविषयी प्रशासकीय अधिकारी सोडता कुणालाच खबर नव्हती़
भांबोरा येथे केसरकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला़ राज्याच्या विस्ताराच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असून, उपलब्ध पोलीस बळाचा कार्यक्षमतेने वापर करण्याबाबत नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले़ पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना कार्यक्षम करणार आहे, असे ते म्हणाले़
भांबोरा येथे आरोपी व पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गावातील १२५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत़ ग्रामस्थांनी ही बाब केसरकर यांच्यासमोर विषद केली़ घटनेची सविस्तर चौकशी करून ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबात पोलीस अधीक्षकांची चर्चा करण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले़ (प्रतिनिधी)
>सात दिवसांची कोठडी
नांदगाव शिंगवे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा मल्हारी सखाराम उपम यास मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़
जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आरोपीस ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली़