पक्षात सह्यांची मोहीम!

By admin | Published: June 5, 2016 12:38 AM2016-06-05T00:38:31+5:302016-06-05T00:38:31+5:30

केवळ आरोपांच्या आधारावर पक्षाकडून नेत्यांचे राजीनामे घेतले जाऊ लागले, तर रोजचे काम करणोही कठीण होईल, असे सांगत भाजपामध्ये सह्यांची मोहीम राबवली गेली. मात्र, काही ज्येष्ठ नेत्यांनी

Sectarian campaign! | पक्षात सह्यांची मोहीम!

पक्षात सह्यांची मोहीम!

Next

- अतुल कुलकर्णी,   मुंबई

केवळ आरोपांच्या आधारावर पक्षाकडून नेत्यांचे राजीनामे घेतले जाऊ लागले, तर रोजचे काम करणोही कठीण होईल, असे सांगत भाजपामध्ये सह्यांची मोहीम राबवली गेली. मात्र, काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यात हस्तक्षेप करत ही मोहीम वेळीच थांबवली.
खडसेंवर झालेल्या आरोपानंतर कारवाई कोणी करायची आणि त्यातून मार्ग कसा काढायचा, यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक झाली. त्यानंतर, शहा यांनी खडसे प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे जाहीर केले, पण मुख्यमंत्र्यांना हा निर्णय दिल्लीतून अपेक्षित होता. शेवटी नितीन गडकरींनी हे ऑपरेशन पार पाडावे असे ठरले आणि त्यानुसार पुढील सूत्रे हलली.
विधान परिषदेची निवडणूक पार पडू दे, असे सांगत काही दिवस जाऊ दिले गेले. निवडणूक बिनविरोध होताच वर्षावर तातडीची बैठक बोलावली गेली. त्यात फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काहींची या विषयावर चर्चा झाली. फार दिवस हा विषय चालू ठेवणो पक्षासाठी घातक असल्याचे सगळ्यांचे मत झाले.
दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनासाठी गडकरी यांनी मुंबईत यावे, असे ठरले होतेच. रात्री गडकरींसोबत पक्षाच्या नेत्यांची, मुख्यमंत्र्यांशी उशिरार्पयत चर्चा झाली. खडसेंसारखा नेता पक्षापासून दूर ठेवणो योग्य नाही, त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा सूर काही नेत्यांनी लावला.
खडसेंनी राजीनामा द्यायचा, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यायची आणि नंतर पुन्हा त्यांचे राजकीय पुर्नवसन करायचे असे ठरले. गडकरींमार्फत हा निरोप खडसेंर्पयत पोहोचविण्यात आला. ह्यतुम्ही राजीनामा देऊन टाका, बाकीचे पक्ष पाहून घेईल,ह्ण असा फोन सकाळीच गडकरींनी खडसेंना केला आणि ते गोव्याला निघून गेले. त्यानंतर, कोंडी फुटली. लगेच खडसे सकाळी 1क्-3क् च्या सुमारास वर्षा निवासस्थानी गेले. तेथे काही ज्येष्ठ मंत्री येऊन थांबले होतेच. आधी खडसे व मुख्यमंत्री या दोघांमध्येच चर्चा झाली. दुपारी पत्रकार परिषद घ्यायचा निर्णय झाला आणि पक्ष खडसेंसोबत उभा आहे, असे प्रदेशाध्यक्षांसह सगळ्यांना एकत्र येऊन जाहीरपणो सांगावे लागले.

राणोंच्या आरोपाने भाजपात अस्वस्थता!
खडसेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे नेते नारायण राणो यांनी भाजपा बहुजन समाजाच्या नेत्यांना लक्ष्य करत आहे, असा गंभीर आरोप केला आणि भाजपा नेत्यांमधील तगमग वाढली. आधी पंकजा मुंडे, नंतर विनोद तावडे आणि आता खडसे यांना चहूबाजूंनी घेरले जात आहे. कोअर टीममधल्या नेत्यांनाच पक्षातून मान मिळत नसेल, तर बाकीच्या कार्यकत्र्यानी जायचे कुठे? असा सवाल प्रदेशाध्यक्षांना विचारला गेला. त्याच वेळी नेमके दुख:या जागेवर राणो यांनी बोट ठेवले आणि पक्षातली अस्वस्थता आणखी वाढली.

अजितदादांचा कित्ता?
आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळ्यांचे आरोप झाले, तेव्हा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता व नंतर आरोपमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देत, ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले होते, तर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर हवालाकांडात आरोप झाल्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला होता. खडसे यांनी असेच पाऊल उचलावे, असेही पक्षातील काही नेत्यांचे म्हणणो होते.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आणि त्यात काहींना राजीनामे द्यावे लागले, तर काहींना तुरुंगवास भोगावा लागला आहे. गेल्या दहा वर्षात गंभीर आरोपाच्या ठळक घटनांचा हा मागोवा.
- 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलेले ह्यबडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते हैह्ण हे विधान त्यांच्या अंगलट आले. त्यांना राजीनामा द्यावा लागला.
- मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासमवेत केलेली ताज हॉटेलची पाहणी वादग्रस्त ठरल्याने विलासरावांना राजीनामा द्यावा लागला.
- ह्यआदर्शह्ण गृहनिर्माण सोसायटीत नातलगांना फ्लॅट दिल्याच्या आरोपावरून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागले.
- महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेनामी संपत्तीमुळे माजी मंत्री छगन भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत.
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जलसंपदा विभागात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता.
- भाजपा सरकार सत्तेवर येताच ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 125 कोटींच्या चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे.
- सार्वजनिक आरोग्य विभागात 297 कोटींचा औषध घोटाळा बाहेर येताच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य विभागाच्या संचालकांसह चार अधिका:यांचे निलंबन केले.
- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अगिअरोधक यंत्रे आणि महापुरुषांच्या फोटो खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. ती खरेदी त्या वेळी थांबविण्यात आली.

Web Title: Sectarian campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.