सुरक्षा बलाचे जवान संपावर, अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचे तीनतेरा, नोकरीच्या हमीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:40 AM2017-09-20T05:40:44+5:302017-09-20T05:41:18+5:30

महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.

Security Force personnel strike, three-wheeler security requirements, job guarantee demand | सुरक्षा बलाचे जवान संपावर, अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचे तीनतेरा, नोकरीच्या हमीची मागणी

सुरक्षा बलाचे जवान संपावर, अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचे तीनतेरा, नोकरीच्या हमीची मागणी

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र सुरक्षा बल महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांनी मंगळवारी अचानक पुकारलेल्या संपामुळे अत्यावश्यक सेवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनवाढीसह कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत सुरक्षा रक्षकांनी हा संप पुकारल्याची माहिती आहे.
सुरक्षा बलाच्या जवानांची सुरक्षा सध्या मुंबई मेट्रोसह विमानतळ, शासकीय रुग्णालये आणि महत्त्वाच्या देवस्थानांबाहेर तैनात करण्यात आली होती. मात्र पूर्वसूचना न देता पुकारलेल्या या संपामुळे सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. संबंधित जवानांचे नेतृत्व करणा-या भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले की, कायमस्वरूपी नोकरीसाठी सर्व जवान २८ सप्टेंबरला लोणावळ्याहून आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहेत. या पदयात्रेतून नोकरीच्या हमीची मागणी जवान करतील.
मुळात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शासनाचे वैधानिक महामंडळ असून, गृह खात्यातील आजी आणि माजी अधिकारी त्यावर देखरेख ठेवत आहेत. त्याबदल्यात अधिकाºयांना ६० ते ७० हजार रुपये पगार मिळत असताना जवानांना मात्र १० ते १२ हजार रुपये वेतन दिले जात आहे. त्यातही आस्थापनांकडून महामंडळ जवानांच्या नावे २२ ते २४ हजार रुपये वसूल करत
आहे.
अशा परिस्थितीत पूर्णवेळ काम करणाºया जवानांना कायमस्वरूपी नोकरीत घेऊन संपूर्ण मोबदला देण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे. नाहीतर १ आॅक्टोबरला संपूर्ण शक्तीनिशी आझाद मैदानात निदर्शने करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
>मेट्रोवर परिणाम नाही!
सुरक्षा बलाचे जवान संपावर गेल्याने मुंबई मेट्रोच्या सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. मुळात सुरक्षा पुरवण्याचे काम राज्य सरकारचे असून, जवान संपावर गेल्यानंतर मेट्रो प्रशासनाने खासगी सुरक्षा पुरवली आहे. शिवाय या आंदोलनाची माहिती राज्य सरकारसह एमएमआरडीए आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षा व्यवस्था काही काळासाठी खंडित झाल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीसह तपासणीच्या ठिकाणी मेट्रोप्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.
>‘महाराष्ट्र सदन’बाहेरही आंदोलन
राज्यातील सुरक्षा बलाच्या जवानांनी संप पुकारल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतील युनिटनेही मंगळवारी दुपारी काम बंद केले. महाराष्ट्र सदनाबाहेर सुरक्षेसाठी तैनात जवान दुपारी कामावर आलेच नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सदनाच्या सुरक्षेबाबतच चर्चेला उधाण आले होते.
नेमके कोण आहेत
हे सुरक्षा बलाचे जवान?
२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, राम प्रधान समितीने केलेल्या शिफारशीनुसार,
मे २०१० साली या सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
राज्यातील १३० आस्थापनांत सुरक्षा बल सुरक्षा पुरविते.
दलाचे ६ हजार जवान राज्यभर तैनात असून, त्यातील ४० टक्के जवान एकट्या मुंबईत काम करत आहेत.
जवानांना गेल्या दीड वर्षांपासून पगारवाढ मिळालेली नाही.
महामंडळ आस्थापनांकडून दरमहा २३ हजार रुपये शस्त्रधारी जवानांसाठी, तर शस्त्राशिवाय असलेल्या जवानांसाठी २० हजार रुपये घेते.

Web Title: Security Force personnel strike, three-wheeler security requirements, job guarantee demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.