बॅकिंग व्यवहाराचा तपशील बघा ‘एम पासबुक’ मध्ये!

By Admin | Published: April 10, 2015 11:47 PM2015-04-10T23:47:59+5:302015-04-10T23:47:59+5:30

एकाच मोबाइलमध्ये बघा विविध बँकांचा तपशील

See details of the banking transaction in 'M passbook'! | बॅकिंग व्यवहाराचा तपशील बघा ‘एम पासबुक’ मध्ये!

बॅकिंग व्यवहाराचा तपशील बघा ‘एम पासबुक’ मध्ये!

googlenewsNext

प्रवीण खेते/अकोला : माहिती तंत्रज्ञानामुळे गत काही वर्षांमध्ये बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. मोबाइल बँकिंग सेवेला नवीन आयाम देणार्‍या ह्यएम-पासबुकह्ण सेवेमुळे बँक ग्राहकांना घरी बसूनच आपल्या बँकिंग व्यवहाराच्या तपशिलाची माहिती मिळवता येते. परिमाणी बँकेशी संबंधित जास्तीत जास्त व्यवहार सर्वसामान्यांना आता घरी बसून करणे सहज शक्य झाले आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँकिंग व्यवहारात मोठी क्रांती घडत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सुरू झालेली ई-बँकिंगची सेवा आता स्मार्टफोनमुळे अधिक सुलभ झाली आहे. बँक ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार अधिक सोयिस्कर व्हावा म्हणून बँकांमार्फत विविध प्रकारच्या बँक सेवा पुरवणारी मोबाइल अँप्सची निर्मिती होत आहे. यातीलच एक ह्यएम पासबुकह्ण नावाचे हे मोबाइल अँप नुकतेच ग्राहकांच्या सेवेत आले आहे. या अँपद्वारे विविध बँकांचे पासबुक आता बँक ग्राहकाच्या खिशात असणार आहे तसेच विविध बँकांच्या खात्यातील व्यवहारासंबधी एकाच मोबाइलमध्ये माहिती संकलित करता येणार आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना वेगवेगळ्य़ा बँकांचे पासबुक वापरण्याची आवश्यकता भासणार नाही. ह्यएम पासबुकह्ण सारख्या सुविधांमुळे बँकिंग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात क्रांतिकारक बदल होत असून, हे क्षेत्र ह्यपेपरलेस वर्कह्णच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परिणामी या अँपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. *काय आहे ह्यएम पासबुकह्ण चा फायदा? एम पासबुक हे एक मोबाइल अँप असून, त्याचा उपयोग इंटरनेट सुरू नसतानादेखील करू शकतो. त्याद्वारे बँक ग्राहकाला बचत खाते किंवा करंट खात्यात झालेल्या बँक व्यवहारांचा तपशील पाहता येतो. सोबतच व्यवहाराचा प्रकार, तारखेनुसार जमा व काढलेल्या रकमा आणि मागील एक वर्षापर्यंतच्या बँक व्यवहाराचा तपशील जतन करून ठेवता येतो व त्याची प्रिंटदेखील काढता येते.

Web Title: See details of the banking transaction in 'M passbook'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.