भाषेवरील प्रभुत्वासाठी पाहा इंग्रजी सिनेमे!
By admin | Published: May 2, 2015 12:50 AM2015-05-02T00:50:18+5:302015-05-02T00:50:18+5:30
विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकताना सर्वप्रथम इंग्रजी ऐकणे व आपसातील संवादावर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा बघणे आवश्यक असून, सिनेमातील
प्रवीण खेते, अकोला
विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा शिकताना सर्वप्रथम इंग्रजी ऐकणे व आपसातील संवादावर भर देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा बघणे आवश्यक असून, सिनेमातील नट-नटींच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या वाचनासोबतच इंग्रजी कॉमेंट्री व रेडिओवरील इंग्रजी भाषा ऐकण्यावर विशेष लक्ष द्यावे, असा सल्ला जर्मनी येथील इंग्रजी भाषा तज्ज्ञ टिचर माईक ट्रॉमर यांनी दिला.
माईक ट्रॉमर यांनी ८ वर्षांपूर्वी थायलंड येथे शाळा स्थापन केली. भारतीय विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा शिकण्याची ओढ पाहून त्यांनी भारताला भेट दिली. भारतातील ही त्यांची पहिलीच भेट असून,अकोला येथील ‘अॅस्पायर दि इन्स्टिट्युट आॅफ ह्युमन डेव्हलपमेंट’ या संस्थेत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे देत आहेत. इंग्रजी भाषा आणि भारतीय विद्यार्थी या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला़ भारतीय विद्यार्थ्यांकडे इतर गोष्टींसोबतच इंग्रजी भाषेचेदेखील चांगले ज्ञान आहे; परंतु या ज्ञानाचा ते कम्युनिकेशन करताना उपयोग करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असूनही ते इंग्रजी भाषा बोलू शकत नाही. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेऊन इंग्रजी भाषेत संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला़ तर संवाद कौशल्य वाढविण्यासाठी इंग्रजी सिनेमे बघा,कॉमेन्ट्री ऐका, बोलताना चुकलं तरी विद्यार्थ्यांनी शांत न राहता इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न कायम ठेवावा, असे ते म्हणाले़ विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा शिकण्याची वेगळीच जिद्द असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले़