पाहा कशी दिसते अवकाशातून मुंबई !

By admin | Published: February 26, 2017 12:29 AM2017-02-26T00:29:50+5:302017-02-26T02:21:35+5:30

फ्रेंचच्या एका अंतराळवीराने चक्क अवकाशातून टिपलेले मुंबईचं एक अद्भूत छायाचित्र शेअर केलं आहे. थॉमस पेस्केट या फ्रेंच अंतराळवीराचं नाव आहे.

See how Mumbai looks from the sky! | पाहा कशी दिसते अवकाशातून मुंबई !

पाहा कशी दिसते अवकाशातून मुंबई !

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - फ्रेंचच्या एका अंतराळवीराने चक्क अवकाशातून टिपलेले मुंबईचं एक अद्भूत छायाचित्र शेअर केलं आहे. थॉमस पेस्केट या फ्रेंच अंतराळवीराचं नाव आहे. थॉमस हा युरोपियन स्पेस एजन्सीचा अंतराळवीर असून, सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करतो आहे.
अंतराळस्थानक भारतावरून जात असताना थॉमस यानं मुंबई शहराचं छायाचित्र टिपलं. त्यानंतर ते शनिवारी ट्विटरवर शेअर केलं. यामध्ये अवकाशातून मुंबई शहर दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालेलं दिसत आहे. तसेच, विमानतळाच्या एक्स आकारातल्या धावपट्ट्या, अंधारलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग हे सारं या छायाचित्रातून स्पष्ट दिसून येत आहे. याचबरोबर, थॉमस यानं अवकाशातून मुंबईसह अनेक देशातील शहरांची टिपलेली छायाचित्रं ट्विटरवर शेअर केली आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालत असलेला सर्वात मोठा कृत्रिम उपग्रह आहे.

Web Title: See how Mumbai looks from the sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.