बियाणे प्रयोगशाळेस आयएसओ

By Admin | Published: June 20, 2016 01:28 AM2016-06-20T01:28:03+5:302016-06-20T01:28:03+5:30

देशातील प्रयोगशाळांची तपासणी करून मूल्यांकन करणाऱ्या नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून (एनएबीएल) पुण्यातील कृषी विभागाच्या

Seed laboratory ISO | बियाणे प्रयोगशाळेस आयएसओ

बियाणे प्रयोगशाळेस आयएसओ

googlenewsNext

पुणे : देशातील प्रयोगशाळांची तपासणी करून मूल्यांकन करणाऱ्या नॅशनल अ‍ॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीजकडून (एनएबीएल) पुण्यातील कृषी विभागाच्या बियाणे परीक्षण प्रयोगशाळेस नुकतेच प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळेतून तपासणी केलेले बियाणे मिळणार आहे. एनएबीएलकडून आयएसओ प्रमाणपत्र मिळणारी पुण्यातील बियाणे तपासणी व परीक्षण प्रयोगशाळा ही राज्यातील दुसरी शासकीय प्रयोगशाळा ठरली आहे.
विविध कंपन्यांचे बियाणे बाजारात विक्रीला येण्यापूर्वी त्यांचे परीक्षण प्रयोगशाळेतून तपासून घेतले जाते. त्यानंतरच ते बाजारात येते. मात्र, काही शेतकरी घरचेच बियाणे शेतात पेरतात. मात्र, हे बियाणे पेरणीसाठी योग्य आहे की नाही, याच्या तपासणीसाठी पुणे, परभणी आणि नागपूर येथे कृषी विभागाच्या प्रयोगशाळा आहेत. शेतात पेरलेले जाणारे बियाणे चांगल्या प्रकारेचे असावे, शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पादन मिळावे, याची काळजी प्रयोगशाळेतील कृषी अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. मात्र, बियाणे तपासण्यासाठी वापरली जाणारी प्रयोगशाळाही आधुनिक असणे गरजेचे आहे. त्यामुळेच पुण्यातील कृषी विभागाच्या प्रयोगशाळेचे बीज परीक्षण अधिकारी व क्वालिटी मॅनेजर महादेव निंबाळकर यांनी एनएबीएलकडे याबाबतचा प्रस्ताव सादर केला. एनएबीएलच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात प्रयोगशाळेला भेट देऊन त्यानंतर प्रमाणपत्र दिले आहे. महाविद्यालयांना नॅककडून मूल्यांकनाचे प्रमाणपत्र दिले जाते. त्याचप्रमाणे एनएबीएलकडून पुण्यातील प्रयोगशाळेला गुणवत्तचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. निंबाळकर यांना त्यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
महादेव निंबाळकर म्हणाले, की एखाद्या प्रयोगशाळेतील कामकाज राष्ट्रीयीकृत नियमाप्रमाणे चालत असेल तरच संबंधित प्रयोगशाळेस एनएबीएलकडून गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळेतून तपासले जाणारे बियाणे देशात व परदेशातही विक्रीस पात्र ठरते. विविध बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्या पुण्यातील बियाणे तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करून मगच बियाणे बाजारात विक्रीस आणतात, तर काही शेतकरीही आमच्याकडे घरातील बियाणे तपासणीसाठी देतात. गेल्या वर्षभरात राज्यातील सोळाहून अधिक जिल्ह्यातील सुमारे ८०० शेतकऱ्यांनी या प्रयोगशाळेतून बियाणे
तपासले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Seed laboratory ISO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.