खासगी बाजारात बियाण्याचे दर ४५ टक्क्यांनी वाढले!
By Admin | Published: June 25, 2016 02:23 AM2016-06-25T02:23:22+5:302016-06-25T02:29:03+5:30
महाबीजने दिली तूर, मूग, उडीद बियाण्यावर दिली सवलत; कापूस, सोयाबीनचे काय?
अकोला: यावर्षी मृग नक्षत्रातील पावसाचे स्वरूप सार्वत्रिक नसले तरी राज्यातील शेतकर्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, शेतकर्यांची बियाणे खरेदीसाठी बाजारात लगबग सुरू झाली आहे, पण महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) व खासगी बाजारातील सोयबीन आणि कापसाचे दर शेतक र्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ते हवालदिल झाले आहेत. राज्यात खरिपातील एकूण पेरणीलायक क्षेत्रापैकी ८0 ते ९0 लाख हेक्टर क्षेत्र हे सोयाबीन व कापसाखाली आहे. असे असताना महाबीजने केवळ मूग, उडीद व तूर बियाण्याचे दर कमी केले आहेत.
मूग, उडीद ही संवेदशील आणि कमी कालावधीची पिके असल्याने त्यांची पेरणी ही ३0 जूनपर्यंत केली जाते. यावर्षी जून महिना संपत आला आहे, हे वास्तव महाबीजला माहिती आहे. असे असताना या न पेरणी होणार्या बियाण्याचे दर कमी करू न महाबीज व शासनाने नेमके काय साधले, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
यावर्षी महाबीजने सोयाबीन बियाण्यावर १0 टक्के वाढ केली असून, महाबीजचे सोयाबीनचा प्रतिकिलो दर ६८ रुपये, तर खासगी कंपन्याचे दर हे ७0 ते ७५ रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. महाबीजची तूर सवलतीत १२0 रुपये प्रतिकिलो, तर खासगी बाजारात दर ३५0 रुपये प्रतिकिलो आहे. महाबीजचे मूग बियाणे २१0 रुपये, तर खासगीमध्ये ३00 ते ४00 रुपये प्रतिकिलो दर आहे. महाबीजच्या उडीद बियाण्याचा दर १२0 रुपये, तर खासगी दर प्रतिकिलो ३२0 रुपये आहे. राज्याला लागणारे सर्वच व पूरक प्रमाणात बियाणे महाबीज देऊ शकत नसल्याने, शेतकर्यांना खासगी बाजारातूच बियाणे खरेदी करावे लागत असल्याने पेरणीसोबतच त्यांच्यापुढे बियाण्याच्या महागाईचे संकट वाढले आहे.
मागील पाच-सहा वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करणार्या शेतकर्यांना २0१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले. उत्पादन आणि उत्पन्नही घटल्याने शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांना सवलती देण्यात येतात. बियाण्यावर अनुदान दिले जाते. ते तर मिळाले नाहीच, उलट महाबीज बियाण्याचे दर ५ ते ३५ टक्के वाढल्याने शेतकर्यांवर संकटच कोसळले आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे मागील वर्षी ६२ रुपये किलो होते, ते यावर्षी ६८ रुपये किलो झाले आहे.