पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 05:03 AM2021-03-20T05:03:18+5:302021-03-20T06:52:46+5:30
एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत.
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. सचिन वाझेच्या अटकेनंतर जप्त केलेली वाहने, तसेच अन्य गोष्टींच्या तपासासाठी शुक्रवारी पुण्याची फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली. सकाळपासून जप्त केलेल्या वाहनांची तपासणी करत त्यावरील पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. (seized vehicle's Inspection by Pune forensic team, suspicion that Vaze had 12 vehicles)
एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ज्यामध्ये २५ फेब्रुवारी रोजी वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचा समावेश आहे. याशिवाय वाझे वापरत असलेल्या २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर यांचाही समावेश आहे. या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येत असल्याचे समजते.
वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय
तपासानुसार वाझे १२ गाड्या वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. ही वाहने वाझेच्या नावावर नाहीत. ताे भागीदार किंवा गुंतवणूकदार असलेल्या तीन कंपन्यांच्या नावे आहेत. आतापर्यंत वाझेच्या ३ गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यात, २ मर्सिडीज बेंज, लँड क्रूझर आहे. अन्य वाहनांचा सहभाग समोर येताच ती जप्त करण्यात येतील, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.